ETV Bharat / city

युती होती, आहे आणि राहील; उद्धव ठाकरेंना विश्वास - क्लस्टरचे काम सुरु

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते ठाण्यात विविध वास्तूंचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये हजुरी येथे 'जितो' ही सामाजिक संस्था आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुसज्ज रुग्णालयाचे उद्घाटन, उथळसर येथील महापालिकेच्या शाळेची पुनर्बांधणी, सामान्य रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी कामाच्या शुभारंभ, फायरब्रिगेड येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या स्मशानभूमीचे उद्घाटन आणि गडकरी रंगायतन येथील स्वातंत्रवीर सावरकर यांच्या शिल्पाचा समावेश आहे.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध वास्तूंचे लोकार्पण
author img

By

Published : Sep 11, 2019, 8:50 PM IST

ठाणे : शिवसेना-भाजपची युती 2014 पासून होती, आहे आणि यापुढेही असेल, असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात युतीवर भाष्य केले आहे. ठाणेकरांनी अनेक वर्षांपासून भगवा उराशी बाळगला असून शिवसेनेने ठाण्याला भव्य नाट्यगृह देखील दिले आहे. त्यामुळे आता ज्यांना नाटके करायची आहे त्यांना करू द्या, असा टोला देखील ठाकरे यांनी लगावला. चार वर्षांपूर्वी 'शिवआरोग्य' ही योजना राबवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, ही योजना राबवता आली नाही. भविष्यात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दाते मिळाले तर ही योजना राबवून महाराष्ट्र निरोगी करू, असे आश्वासनही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले.

uddhav thackeray
रुग्णालयाची पाहणी करतांना उद्धव ठाकरे

जितो संस्थेचा उल्लेख करताना शहरासाठी काही करण्याची इच्छा असणे, अशी जाणीव असणारे लोक फार कमी असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी जितो संस्थेचे कौतुक केले. करून दाखवले या शब्दात खूप सामर्थ्य आहे. २०१४ ला शिवआरोग्य या योजेनचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यावेळी ग्रामीण भागातील रुग्णांचा यात विशेष विचार करण्यात आला. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी थेट सॅटेलाईटच्या माध्यमातून तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, जर जितो संस्थेसारखे दाते असल्यास अशी योजना राबवून संपूर्ण महाराष्ट्र निरोगी करू, असे आश्वासन देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. आजकाल जमीन दिसली कि हडप करण्याची प्रथा आहे. मात्र, अशा जागा देणारे दाते अजूनही असल्याने शहरात अनेक चांगल्या वास्तू निर्माण झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - नागपूर : आता ग्रामपंचायतीचा कारभार पाहणार मुख्याध्यापक.. विद्यार्थ्यांचं नुकसान?

या कार्यक्रमाला महापौर मीनाक्षी शिंदे, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, जितो एज्युकेशन आणि मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त अजय आशर, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, उपनेते अनंत तरे आदी मान्यवर उपस्थित होते.

eknath shinde
पालकमंत्री एकनाथ शिंदे
पालकमंत्र्यांनी काढले चिमटे -
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने पालिका आयुक्त संजीव आणि लोकप्रतिनिधीमध्ये झालेला वाद मिटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात चांगल्याच कानपिचक्या दिल्या. एकनाथ शिंदे यांच्या आधी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी भाषण करून शहरात सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यांतर एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रकल्पाचा आढावा घेतला असल्याने माझं काम हलके केले असून मातोश्रीवर झालेल्या बैठकीचा उल्लेख टाळत आयुक्तांचे काम देखील मी हलके केले असल्याचा टोला एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला.
महापौर सर्व लोकप्रतिनिधी आणि पालिका आयुक्त नेहमीच हातात हात घालून काम करतात. मात्र, काम करताना कधी कधी थोडी गडबड होत असल्याचे सांगत आता उद्धव ठाकरे यांनी विकासाला प्राधान्य द्या, असे सांगत सर्वानाच समज दिली असल्याचे त्यांनी या कार्यक्रमात आवर्जून सांगितले. जितो सारख्या संस्थाकडे लक्ष्मी आहे, तर शिवसेनेने अशा संस्थाना संरक्षण दिले. शिवसेनेमुळेच महाराष्ट्र सुरक्षित असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. क्लस्टरचा एक तरी नारळ फोडा अन्यथा इतर कामांचा देखील काही उपयोग होणार नाही, अशा कानपिचक्या देखील त्यांनी आयुक्तांना दिल्या.
आचारसंहिता संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी क्लस्टरचे काम सुरु करणार - पालिका आयुक्त
विधानसभेच्या आचारसंहितेच्या आधी क्लस्टरचा कामाचा एक तरी नारळ फुटेल असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र, लोकांच्या शंका आणि त्रुटी असल्याने या सर्व गोष्टींना विलंब झाला. मात्र, जर आचार संहितेपूर्वी जर एका तरी क्लस्टरचा नारळ फोडता आला नाही तर आचार संहिता संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका तरी क्लस्टरच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, हा प्रशासन म्हणून माझा शब्द असल्याचे पालिका आयुक्तांनी यावेळी घोषणा केली. मातोश्रीवर झालेल्या बैठकी नंतर आयुक्तांच्या वक्तव्यांमध्ये देखील वेगळेपना दिसून आला. सभागृहात काम करताना महापौर आणि लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य मिळत असल्याचा आवर्जून उल्लेख पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यावेळी केला.

हेही वाचा - केरळमध्ये ओणमचा उत्साह, 'या' मंदिरात वानरांना देण्यात आली 'मेजवानी'

भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आवर्जून उपस्थिती -

शिवसेनेच्या वतीने विविध प्रकारच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा असला तरी, गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या या मुख्य कार्यक्रमात भाजपच्या नेत्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. यामध्ये आमदार संजय केळकर, एड. निरंजन डावखरे, भाजपचे गटनेते नारायण पवार, ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर, शहर अध्यक्ष संदीप लेले आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. त्यामुळे पालिका आयुक्तांच्या विरोधात एकवटलेले भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी विकासकामांच्या मुद्द्यावरहे एकत्र येताना यावेळी दिसले.

हेही वाचा - नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आपली ताकत दाखवेल - जयंत पाटील

Intro:युती होती, आहे आणि राहील
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोषणाBody:

शिवसेना आणि भाजपची युती 2014 पासून होती,आहे आणि यापुढेही असेल असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात युतीवर शिक्कामोर्तब केले आहे . ठाणेकरांनी अनेक वर्षांपासून भगवा उराशी बाळगला असून शिवसेनेने ठाण्याला भव्य नाट्यगृह देखील दिले आहे,त्यामुळे आता ज्यांना नाटकं करायची आहे त्यांना करू द्या असा टोला देखील उद्धव ठाकरे लगावला आहे.चार वर्षांपूर्वी शिव आरोग्य ही योजना राबवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता मात्र ही योजना राबवता आली नाही, भविष्यात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दाते मिळाले तर ही योजना राबवून महाराष्ट्र निरोगी करू असे आश्वासन देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले .
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध वास्तूंचे लोकार्पण करण्यात आले .यामध्ये हजुरी येथे जितो ही सामाजिक संस्था आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुसज्ज रुग्णालयाचे उदघाटन,उथळसर येथील महापालिकेच्या शाळेची पुनर्बांधणी,सामान्य रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी कामाच्या शुभरंभ,फायरब्रिगेड येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या स्मशानभूमीचे उदघाटन आणि गडकरी रंगायतन येथील स्वातंत्रवीर सावरकर यांच्या शिल्पाचा समावेश आहे .
जितो संस्थेचा उल्लेख करताना शहरासाठी काही करण्याची इच्छा असणे अशी जाणीव असणारे लोक फार कमी असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी जितो संस्थेचे कौतुक केले . करून दाखवले या शब्दात खूप सामर्थ्य आहे . २०१४ साली शिव आरोग्य या योजेनचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यावेळी ग्रामीण भागातील रुग्णांचा यात विशेष विचार करण्यात आला होता . ग्रामीण भागातील रुग्णांसाठी थेट सॅटेलाईटच्या माध्यमातू तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली. मात्र जर जितो संस्थेसारखे दाते असल्यास अशी योजना राबवून संपूर्ण महाराष्ट्र निरोगी करून असे आश्वासन देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. आजकाल जमीन दिसली कि हडप करण्याची प्रथा आहे , मात्र अशा जागा देणारे दाते अजून ही असल्याने शहरात अनेक चांगल्या वास्तू निर्माण झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला महापौर मीनाक्षी शिंदे, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, जितो एजुकेशन आणि मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त अजय आशर,शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, उपनेते अनंत तरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी काढले चिमटे -
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने पालिका आयुक्त संजीव आणि लोकप्रतिनिधीमध्ये झालेल्या वाद मिटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले . यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात चांगल्याच कानपिचक्या दिल्या. एकनाथ शिंदे यांच्या आधी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी भाषण करून शहरात सुरु असलेल्या सर्व प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यांतर एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रकल्पाचा आढावा घेतला असल्याने माझं काम हलके केले असून मातोश्रीवर झालेल्या बैठकीचा उल्लेख टाळत आयुक्तांचे काम देखील मी हलके केले असल्याचा टोला एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला. महापौर सर्व लोकप्रतिनिधी आणि पालिका आयुक्त नेहमीच हातात हात घालून काम करतात मात्र काम करताना कधी कधी थोडी गडबड होत असल्याचे सांगत आता उद्धव ठाकरे यांनी विकासाला प्राधान्य द्या असे सांगत सर्वानाच समज दिली असल्याचे त्यांनी या कार्यक्रमात आवर्जून सांगितले. जितो सारख्या संस्थाकडे लक्ष्मी आहे तर शिवसेनेने अशा संस्थाना संरक्षण दिले . शिवसेनेमुळेचा महाराष्ट्र सुरक्षित असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. क्लस्टरचा एक तरी नारळ फोडा अन्यथा इतर कामांचा देखील काही उपयोग होणार नाही अशा कानपिचक्या देखील त्यांनी आयुक्तांना दिल्या.

आचारसंहिता संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी क्लस्टरचे काम सुरु करणार - पालिका आयुक्त
विधानसभेच्या आचारसंहितेच्या आधी क्लस्टरचा कामाचा एक तरी नारळ फुटेल असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र लोकांच्या शंका आणि त्रुटी असल्याने या सर्व गोष्टींना विलंब झाला . मात्र जर आचार संहितेपूर्वी जर एका तरी क्लस्टरचा नारळ फोडता आला नाही तर आचार संहिता संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका तरी क्लस्टरच्या कामाला सुरुवात करण्यात येईल हा प्रशासन म्हणून माझा शब्द असल्याचं पालिका आयुक्तांनी यावेळी घोषणा केली. मातोश्रीवर झालेल्या बैठकी नंतर आयुक्तांच्या वक्तव्यांमध्ये देखील वेगळेना दिसून आले . सभागृहात काम करताना महापौर आणि लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य मिळत असल्याचा आवर्जून उल्लेख पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केला.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आवर्जून उपस्थिती -
शिवसेनेच्या वतीने विविध प्रकारच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा असला तरी,गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या या मुख्य कार्यक्रमात भाजपच्या नेत्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती . यामध्ये आमदार संजय केळकर, एड. निरंजन डावखरे, भाजपचे गटनेते नारायण पवार, ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर , शहर अध्यक्ष संदीप लेले आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. त्यामुळे पालिका आयुक्तांच्या विरोधात एकवटलेले भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी विकासकामांच्या मुद्द्यावरहे एकत्र येताना यावेळी दिसले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.