ETV Bharat / city

Uddhav Thackeray : 'ही मंडळी दरोडेखोर, शिवसेना संपवायला...'; उद्धव ठाकरेंची बंडखोरांवर जळजळीत टीका - उद्धव ठाकरे मराठी बातमी

उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर हल्ला चढवला आहे. ही मंडळी दरोडेखोर आहेत. ते शिवसेना संपवायला निघालेत. त्यांचं शिवसेना संपवायचं मोठं कारस्थानं आहे, असा निशाणा उद्धव ठाकरेंनी साधला ( uddhav thackeray attacked shivsena rebel mla ) आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
author img

By

Published : Jul 24, 2022, 9:33 PM IST

Updated : Jul 24, 2022, 9:53 PM IST

मुंबई - शिवसेना हिंदुत्वासाठी जगते. मात्र, भाजपा राजकारणाकरिता हिंदुत्व वापरते. हा फरक शिवसेना आणि भाजपमध्ये आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला आहे. मुंबईतील शिवडी येथील शिवसेना शाखेचं उद्घाटन उद्धव ठाकरेंनी केलं. यावेळी अरविंद सावंत, सुभाष देसाई, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित ( uddhav thackeray attacked shivsena rebel mla ) होते.

'तुम्हाला माझ्या आई-वडिलांच्या...' - शिंदे गटातील बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंनी आव्हान दिलं आहे. 'त्यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या फोटेने मतं मागावती. हिंम्मत असेल तर माझ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा फोटो न लावता तुम्ही मत मागा. तुम्हाला माझ्या आई-वडिलांच्या फोटो लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही,' अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

'तुम्ही तयार राहा' - गेलेल्या बंडखोरांना काय म्हणाले अशी विचारणा करताच उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, 'ही मंडळी दरोडेखोर आहेत. ते शिवसेना संपवायला निघालेत. त्यांचं शिवसेना संपवायचं मोठं कारस्थानं आहे. त्याला उत्तर द्यावे लागणार. गट प्रमुखांचे प्रतिज्ञापत्र, कायदेशीर संघर्षासाठी लागणार आहे. तुम्ही तयार राहा. तुमच्या दोन्ही हातांमध्ये सदस्यांचे अर्जाचे गठ्ठे असायला हवे. फुलांचे गुच्छ नकोत. मला सदस्यांचे अर्जाचे पदाधिकारी यांचे शपथपत्र हवे,' असे आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं आहे.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करताना

'शिवसैनिक हे पुरून उरतील' - 'त्यांच्याकडे निष्ठावंत शिवसैनिक नाहीत. मात्र, माझ्याकडे खऱ्या शिवसेनेकडे निष्ठावंत आहेत. आता ही लढाई पैसा, विरुद्ध निष्ठा अशी आहे. तुम्ही कितीही पैसा ओता, माझं वैभव म्हणजे शिवसैनिक हे पुरून उरतील. लवकरच गणपती बाप्पा येत आहे. बाप्पाला साकडं घालतोय. तुमच्या आगमनाआधी हे संकट दूर कर. तुझ्या तेजाने शिवसेनेचा भगवा फडकू दे,' असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

'शेवटी विजय आपलाच होणार' - एकनाथ शिंदेंचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले, 'हे मुख्यमंत्री किती दिवसाचे माहीत नाही. मी एका क्षणात वर्षा सोडले आणि मातोश्री मध्ये गेलो. मातोश्रीमध्ये परत आल्यावर ही तुमची शक्ती मिळाली. या शक्तीला त्रिवार वंदन करतो, शेवटी विजय आपलाच होणार, असा आशावाद व्यक्त करत, ते लोकं आता ज्या जनतेने निवडून दिले. आता कुणाच्या केंद्रीय विविध एजन्सीच्या संरक्षणात फिरत आहात,' असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्ला; 'कपाळावर बसलेला विश्वासघाताचा शिक्का पुसता येणार नाही'

Last Updated : Jul 24, 2022, 9:53 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.