ETV Bharat / city

Udayanraje Bhosale : हे आज नाहीतर उद्या होणारच होतं; कारण हे गठबंधन अनैसर्गिक होते : उदयनराजे भोसले - This alliance is unnatural

महाराष्ट्रातील राजकारणात राजकीय घडामोडींना ( Political Crisess in Maharastra ) वेग आलेला असताना आज दिवसभर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Former CM Devendra Fadnavis ) यांच्या बंगल्यावर भाजपा नेत्यांची वर्दळ वाढली होती. याप्रसंगी उदयनराजे भोसले ( Udayan Raje Bhosale ) यांनीसुद्धा देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार गठबंधन अनैसर्गिक ( This alliance is unnatura ) असल्याचं सांगितलं आहे.

Udayan Raje Bhosle
उदयनराजे भोसले
author img

By

Published : Jun 24, 2022, 6:19 PM IST

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात राजकीय घडामोडींना वेग ( Political Crisess in Maharastra ) आलेला असताना आज दिवसभर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Former CM Devendra Fadnavis ) यांच्या बंगल्यावर भाजपा नेत्यांची वर्दळ वाढली होती. याप्रसंगी उदयनराजे भोसले ( Udayan Raje Bhosale ) यांनीसुद्धा देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार गठबंधन अनैसर्गिक असल्याचं सांगितलं आहे.

उदयनराजे भोसले

काय म्हणाले उदयनराजे : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे. असे वारंवार सांगितले जाते. त्यावर बोलताना उदयनराजे म्हणाले की, याला भूकंप म्हणता येणार नाही कारण हे होणारच होतं. हे अगोदरच व्हायला पाहिजे होतं परंतु आता होत आहे. करण हे अनैसर्गिक गठबंधन होते. त्यावेळेला निवडून आलेल्या आमदारांना विचारात घेऊन जर सरकार स्थापन केल असते तर हे सरकार कधीच स्थापन झाले नसते. त्यावेळेला गठबंधन झाले ते फक्त सरकार स्थापन करण्यासाठी झाले होते. ते फार काळ टिकणारे नव्हते.

गठबंधन का तोडले : काही महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. उद्या मतदारसंघामध्ये गेल्यानंतर स्थानिक लोकांना काय सांगणार? गठबंधन कशासाठी झालं होतं. का तोडले गेले? असा प्रश्नही उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.

आम्हाला धमकी देऊ नका : गुवाहाटीमध्ये गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर आमदारांना, तुम्हाला मुंबईत यावेच लागेल, अशा पद्धतीचे वक्तव्य काल राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी केले होते. त्यावर बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, धमकी द्यायची भाषा करायची नाही. धमकीची भाषा करणे योग्य नाही. आम्ही कोणालाही घाबरत नाही.

हेही वाचा : Shivsena Big Action : शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांना केला अर्ज, 'या' 16 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची केली मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.