ETV Bharat / city

'अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी गुणांची अट शिथिल' - cet exam latest news

12वी आणि प्रवेश पात्रता परीक्षेच्या गुणांनुसारच अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत असे. तसेच यासाठी किमान गुणांची मर्यादा देखील ठेवण्यात आलेली होती. मात्र, यंदा ही मर्यादा ५ टक्क्यांनी कमी करण्यात आल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

मंत्री उदय सामंत
मंत्री उदय सामंत
author img

By

Published : Oct 11, 2020, 8:28 PM IST

मुंबई - अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे. तसेच सुधारित गुणांच्या अटीनुसार पुढील प्रवेश होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

मंत्री सामंत म्हणाले, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावीला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र या विज्ञान विषयांमध्ये किमान ५० टक्के गुण मिळणे आणि प्रवेश पात्रता परीक्षा (सीईटी) देणे आवश्यक होते. आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीला ४५ टक्के गुण पुरेसे ठरणार आहेत. तर राखीव गटांसाठी ४० टक्के गुण पुरेसे ठरणार आहेत.

सामंत म्हणाले, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पात्रतेच्या निकषांमध्ये यंदा बदल करण्यात आल्यामुळे, प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे. बारावीचे पात्रता गुण पाच टक्क्यांनी कमी केले आहेत. याचा फायदा असंख्य विद्यार्थ्यांना होणार आहे. या निर्णयामुळे सीईटी परीक्षेमध्ये किमान एक गुण आणि बारावीला खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान 45 टक्के गुण व मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४०% असतील तर ते आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र होऊ शकणार आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा - जे विराट, रोहितला जमले नाही, ते पाकिस्तानच्या शोएब मलिकने करून दाखवले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.