ETV Bharat / city

अँटिलिया कार स्फोटक प्रकरण : सोशल क्लबचा दोन महिन्यांचा डीव्हीआर 'एनआयए'कडून जप्त - आशिष सोशल क्लबवर एनआयएचा छापा

एक एप्रिलला 'एनआयए'ने गिरगाव चौपाटी नजीक एका कल्चर क्लबवर छापा टाकला होता. हा क्लब आशिष सोशल क्लब या नावाने ओळखला जात होता.

ashish club
आशिष क्लब
author img

By

Published : Apr 2, 2021, 6:56 PM IST

मुंबई - एक एप्रिलला 'एनआयए'ने गिरगाव चौपाटी नजीक एका कल्चर क्लबवर छापा टाकला होता. हा क्लब आशिष सोशल क्लब या नावाने ओळखला जात होता. या क्लबच्या आतमध्ये जुगार अड्डा होता. एनआयएने छापा टाकल्यानंतर या क्लबमधून अनेक लोकं बाहेर पडले. दरम्यान, एनआयएने सोशल क्लबमधील सगळे सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतले आहेत.

हेही वाचा - मुख्यमंत्री काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष, समाजमाध्यमातून रात्री 8:30ला साधणार संवाद

दोन महिन्यांचा डीव्हीआर एनआयएच्या ताब्यात

एनआयएने आशिष क्लबवर गुरुवारी छापा टाकला होता. या क्लबच्या मॅनेजरची चौकशीदेखील करण्यात आली आहे. यानंतर आत या क्लबमधील सर्व सीसीटीव्ही फूटेज एनआयएने ताब्यात घेतले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने एनआयए आपला पुढील तपास करत आहे. तब्बल दोन महिन्यांचा डीव्हीआर हा एनआयएने ताब्यात घेतला आहे.

क्लबच्या मॅनेजरची चौकशी सुरू

या सोशल क्लबचे मॅनेजर देवीसेट जैन यांनी नरेश गोर याला सिम कार्ड पुरवले आहेत अशी माहिती मिळते. देवीसेट जैन यांची एनआयएकडून चौकशी केली जात आहे .सिम कार्डवाल्या मैत्रीनंतर आशिष सोशल क्लब या ठिकाणी सचिन वाझे, विनायक शिंदे आणि नरेश गोर या ठिकाणी वारंवार यायचे. त्यामुळे कुठेतरी अँटिलिया कार स्फोटक प्रकरणाचा कट 2 महिन्यांपूर्वी रचल्याचा संशय बळावतो.

हेही वाचा - नाशकात बेड न मिळाल्याने केले आंदोलन, कोरोना रुग्णाचा हकनाक गेला जीव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.