मुंबई - पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सच्या पथकाने मुंबई खार येथून बंदी घातलेल्या जिहादी दहशतवादी संघटना आणि अत्यंत कट्टरतावादी संघटनेशी नियमित संपर्कात असल्याच्या आरोपाखाली दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एसटीएफ पश्चिम बंगालच्या अधिकाऱ्यांनी एटीएस मुंबईच्या मदतीने ही कारवाई केली आहे.
पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) दिलेल्या माहितीनुसार, समीर हुसेन शेख आणि सद्दाम हुसैन खान अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. समीर हुसेन शेख याला डायमंड हार्बर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तर सद्दाम हुसेन खान याला मुंबईतील निर्मलनगर येथून अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - Five JDU MLAs join BJP: जेडीयूच्या पाच आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, पाहा काय म्हणाले नितीश कुमार