ETV Bharat / city

Central Railways Megablock : रविवारी मध्य रेल्वेचा तब्बल बारा तासाचा मेगाब्लॉक ; लोकलसह मेल- एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम! - Central Railways Megablock

मध्य रेल्वे दिलेल्या माहितीनुसार, ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत ( Central Railways megablock in Mumbai ) सीएसएमटी स्थानकावरून सकाळी 7.55 ते संध्याकाळी 7.50 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल मुलुंड, ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार ( Diva to Kalyan station of Central Railway ) आहे.

रेल्वे मेगाब्लॉक
रेल्वे मेगाब्लॉक
author img

By

Published : Apr 1, 2022, 8:18 PM IST

मुंबई- मुंबई विभागातील दिवा स्थानकावरील जुनी रुटरिले इंटरलॉकिंग इमारत ( interlocking building at Diva station ) पाडून आणि अप आणि डाऊन जलद मार्गावरील विविध देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. कामासाठी मध्य रेल्वेच्या दिवा ते कल्याण स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार ( Megablock on Sunday ) आहेत. त्यामुळे प्रवाशांनी मोठी गैरसोय होणार आहे.

असा असणार मेगाब्लॉक-
मध्य रेल्वे दिलेल्या माहितीनुसार, ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात ( Mumbai local railway timings ) येणार आहे. या ब्लॉक कालावधीत ( Central Railways megablock in Mumbai ) सीएसएमटी स्थानकावरून सकाळी 7.55 ते संध्याकाळी 7.50 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल मुलुंड, ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार ( Diva to Kalyan station of Central Railway ) आहे. विशेष म्हणजे, निर्धारीत थांब्यायानुसार स्थानकावर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या दहा ते पंधरा मिनिटे उशिरा या लोकलसेवा पोहोचतील. सकाळी 8.30 ते रात्री 9.12 पर्यत कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल कल्याण आणि ठाणे/मुलुंड तांका दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. निर्धारित थांब यानूसार स्थानकावर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत.

मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम- रेल्वे ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर येथून सुटणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. निर्धारित वेळेपेक्षा 15 ते 20 मिनिटे उशिराने पोहोचतील. तसेच सीएसएमटी आणि दादरला येणार मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्या कल्याण ते ठाणे, विक्रोळी स्थानकादरम्यान चाव्या मार्गावर वळविण्यात येतील. निर्धारित वेळेपेक्षा 15 ते 20 मिनिटे उशिराने पोहोचतील. या विशेष मेगाब्लॉकमध्ये होणार्‍या गैरसोयी बाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलेले आहेत.

हेही वाचा-Allegations of Nitesh Rane : गिरगाव चौपाटी दर्शक गॅलरी - पालिकेने नितेश राणेंचे आरोपातील हवा काढली

हेही वाचा-Maharashtra Weather Update : 'या' तीन जिल्ह्यांत उष्णतेची लाट; तर दक्षिण कोकणात पावसाचा इशारा

हेही वाचा-Home Minister On Raut : संजय राऊत यांची भावना योग्यच गृहमंत्री वळसे- पाटील यांच्याकडून दुजोरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.