ETV Bharat / city

मतदार यादीत नाव नसल्याचा फटका, सिने कलाकार सोनाली नाईक मतदानापासून वंचित - Mumbai voting

आपल्या एका मताने  फरक पडेल, असे अनेकांना वाटत असते. त्यांच्या भावनांचा आदर करून सरकारने काही उपाययोजना कराव्यात, असे सोनाली नाईकने म्हटले.

author img

By

Published : Apr 29, 2019, 12:39 PM IST

मुंबई - लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबईकरासंह अनेक सेलेब्रिटी उत्साहाने मतदान करत आहेत. मात्र मराठी सिने कलाकार असलेल्या सोनाली नाईकला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. कारण तिचे उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतदार यादीत नाव नव्हते.

उत्तर पश्चिम मतदारसंघात असलेल्या बिंबिसार नगर येथील पालिका शाळेत सोनाली नाईक ही मतदान करण्यासाठी आली होती. मात्र मतदान यादीत नाव नसल्याने तिचा हिरमोड झाला. याबाबत ईटीव्ही भारतशी बोलताना सोनाली नाईक म्हणाली, यादीत नाव नसणे, ही जशी सरकारची तशी माझीही चूक आहे.

सोनाली नाईक

गेल्यावर्षी माझे मतदार यादीत नाव होते. या वर्षीही यादीत असेल, असे वाटले. मात्र पहिल्यांदाच माझे मतदार यादीत नाव नाही. यामागील कारण माहित नाही. आपल्या एका मताने फरक पडेल, असे अनेकांना वाटत असते. त्यांच्या भावनांचा आदर करून सरकारने काही उपाययोजना कराव्यात, असे सोनालीने म्हटले.

Intro:मतदार यादीत नाव नसल्याने मराठी सिने कलाकार सोनाली नाईकला मतदानाला मुकावे लागले.

Body:उत्तर पश्चिम मतदारसंघात असलेल्या बिंबिसार नगर येथील पालिका शाळेत आल्या होत्या मतदान करायला.

Conclusion:याबाबत सरकारने काही उपाययोजना कराव्यात असे सोनाली नाईक यांनी म्हटले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.