ETV Bharat / city

एसटीच्या स्मार्टकार्ड योजनेला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ; जुन्याच कार्डवर मिळणार सवलतींचा लाभ

कोरोनाच्या काळात स्मार्टकार्डचे नूतनीकरण करण्यासाठी तसेच नवीन कार्ड घेण्यासाठी अनेकांना आगारात जाण्यासाठी अडचणी येणार आहेत. त्यामुळे एसटीने स्मार्टकार्ड योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

स्मार्ट कार्ड
स्मार्ट कार्ड
author img

By

Published : Nov 27, 2020, 4:34 PM IST

Updated : Nov 27, 2020, 4:45 PM IST

मुंबई - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) स्मार्टकार्डधारकांना व ज्येष्ठ नागरिकांना अखेर मोठा दिलासा दिला आहे. स्मार्टकार्ड योजनेची मुदत 31 नोव्हेंबरला संपत आहे. या योजनेला 1 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

कोरोनाच्या काळात स्मार्टकार्डचे नूतनीकरण करण्यासाठी तसेच नवीन कार्ड घेण्यासाठी अनेकांना आगारात जाण्यासाठी अडचणी येणार आहेत. त्यामुळे एसटीने स्मार्टकार्ड योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. स्मार्टकार्ड योजनेला मुदतवाढ मिळाल्याने प्रवाशांना नुतनीकरण करण्याची गरज लागणार नाही. प्रवाशांना जुन्या कार्डवर तिकीटातील सवलत घेता येणार आहे.

हेही वाचा-'टीका-टिप्पणी करतेवेळी भान राखणे गरजेचे', कंगनालाही न्यायालयाने दिली समज

कॅशलेस प्रवासासाठी स्मार्टकार्ड योजना

एसटी प्रवाशांना कॅशलेस प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी एसटीने स्मार्टकार्ड योजना आणली. मुंबई लोकलच्या एटीव्हीएम प्रणालीच्या धर्तीवर एसटीने स्मार्टकार्ड सुरू केली आहे. प्रवाशांना 50 रुपयांत स्मार्टकार्ड खरेदी करून 300 रुपयांची रक्कम कार्डवर जमा करावी लागते. तर पुढे 100 ते 5 हजार रुपयापर्यंत कार्डवर रक्कम जमा करता येते. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

स्मार्टकार्डला तिसऱ्यांदा मुदतवाढ
स्मार्टकार्डला तिसऱ्यांदा मुदतवाढ

हेही वाचा-दिवाळी सुट्टीमध्ये एसटीच्या दररोज 1 हजार जादा फेऱ्या होणार सुरू

एसटीकडून 27 विविध सामाजिक घटकांना 33 टक्के ते 100 टक्के सवलत-

दरम्यान, एसटीकडून 27 विविध सामाजिक घटकांना 33 टक्के ते 100 टक्के अशी तिकीटात सवलत दिली जात आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा-विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या सवलतीचा लाभ बोगस लाभार्थी लाटत असल्याच्या तक्रारी होत्या. तेव्हा ही बाब लक्षात घेत लाभार्थ्यांना आधार कार्ड क्रमांकाशी जोडलेले स्मार्टकार्ड योजना आणली. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारात कार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याआधीही स्मार्टकार्डला मुदतवाढ
यापूर्वी एसटी महामंडळाकडून स्मार्टकार्डच्या वापराला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत संपण्यासाठी तीन दिवस उरले आहेत. पण कोरोनाची संकट अजूनही कायम आहे. अशा परिस्थितीत परिवहनमंत्री परब यांनी या योजनेला मुदतवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे प्रवाशांना 31 मार्च 2021 पर्यंत जुने स्मार्ट कार्ड वापरता येणार आहे.

Last Updated : Nov 27, 2020, 4:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.