ETV Bharat / city

Marathi Boards : पाट्यांवरील मोठ्या मराठी अक्षरांना व्यापाऱ्यांचा विरोध, मनसेने दिला खळ्ळखट्याचा इशारा

महाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्यांची सक्ती करणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मनसेने या निर्णयाची पाठराखण करताना केवळ घोषणा न करता अंमलबजावणी करावी. अन्यथा मनसेला पुन्हा खळखट्याक करावे लागेल, असा इशारा दिला आहे. तर मराठीच्या सक्तीला हरकत नाही. पण, इंग्रजीत किंवा अन्य भाषेत पाटी लावण्यास संमती द्यावी, अशी भूमिका व्यापारी संघटनांनी ( Traders Union Oppose on Marathi Board ) घेतली आहे.

संदीप देशपांडे
संदीप देशपांडे
author img

By

Published : Jan 13, 2022, 6:09 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्यांची सक्ती करणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मनसेने या निर्णयाची पाठराखण करताना केवळ घोषणा न करता अंमलबजावणी करावी. अन्यथा मनसेला पुन्हा खळखट्याक करावे लागेल, असा इशारा दिला आहे. तर मराठीच्या सक्तीला हरकत नाही. पण, इंग्रजीत किंवा अन्य भाषेत पाटी लावण्यास संमती द्यावी, अशी भूमिका व्यापारी संघटनांनी घेतली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय आता वादात सापडला असून यावर शासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाट्यांवरील मोठ्या मराठी अक्षरांना व्यापाऱ्यांचा विरोध, मनसेने दिला खळ्ळखट्याचा इशारा

दहा पेक्षा कमी किंवा त्याहून जास्त कामगार संख्या असलेल्या आस्थापनांना देवनागरी लिपीत म्हणजेच मराठी भाषेमध्ये पाट्या ( Marathi Boards on Shops ) लावाव्यात. दुकानदारांना मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतील पाटी लिहिण्यास संमती असेल. मात्र, मराठी भाषेला प्राधान्य दिले जावे, इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा मराठी अक्षरे लहान असू नयेत. मद्य विक्री किंवा मद्यपान विक्रेत्यांनी महापुरुष, महिला किंवा गड किल्ल्यांची नावे देऊ नयेत, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यभरात या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

... तर खळ्ळखट्याक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray on Marathi Boards ) यांनी मराठी पाट्यांचा मुद्दा मनसेचा होता. कोणीही श्रेय लाटू नका, असा टोला शिवसेनेला लगावला आहे. तसेच राज्य शासनाच्या या निर्णयाला समर्थन देताना, तत्काळ अंमलबजावणी करावी, असे म्हटले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे ( MSN Leader Sandeep Deshpande ) यांनी राज ठाकरे यांच्या विधानाचे समर्थन केले. उशीरा का होईना शासनाला जाग आली. आता त्याची ठोस अंमलबजावणी करावी. राज्य शासनाच्या निर्णयाची दुकानदारांनी पूर्तता न केल्यास खळ्ळखट्याक करावे लागेल, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

व्यापारी संघटनेचा विरोध - राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे फलक मराठी भाषेत असाव्यात, या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी विरोध दर्शवला ( Traders Union Oppose on Marathi Board ) आहे. मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. त्यामुळे दुकानांच्या पाटीवर मोठ्या अक्षरात नाव लिहिताना कोणत्या भाषेचा वापर करावा, हा व्यापाऱ्यांचा हक्क आहे. राज्य सरकारचा हा निर्णय व्यापाऱ्यांवर अन्यायकारक ठरेल. तसेच दुकानदारांना व्होट बँक पॉलिटिक्स पासून दूर ठेवा. दुकानाला मराठी पाट्या लावू, पण मोठ्या अक्षरातील मराठी पाट्यांची सक्ती करु नका, असे शाह यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Vijay Gawhane joins NCP : परभणीतील भाजपला मोठा धक्का, विजय गव्हाणे यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.