मुंबई - मुंबई महापालिका मुख्यालयात महाराष्ट्र पर्यटन मंडळ आणि मुंबई महापालिकेच्या पुढाकारातून पालिकेच्या मुख्यालयात हेरिटेज वॉक हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (२८ जानेवारी) झाले. आजपासून या उपक्रमाची सुरुवात झाली.
दरम्यान, पालिका मुख्यालय इमारत पाहताना खूप चांगले वाटत आहे. घरी गेल्यावर आम्ही इतर लोकांनाही हेरिटेज वॉक घ्यावा, असे नक्की सांगू, अशी प्रतिक्रिया या वॉकमध्ये सहभागी होण्याचा पहिला मान मिळालेल्या मालाडहून आलेल्या सिताराम शेट्टी व सायन येथून आलेल्या अर्चना अशोक नेवरेकर यांनी दिली आहे.
महापौरांकडून स्वागत -
मुंबई महापालिका मुख्यालयाची इमारत १२५ वर्ष जुनी आहे. ऐतिहासिक अशा इमारतीमध्ये महाराष्ट्र पर्यटन मंडळ व मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हेरिटेज वॉक ही संकल्पना राबवण्यात येत आहे. हेरिटेज वॉकचा आज पहिला दिवस असून त्याचा आढावा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला. तसेच या वॉकमध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या बॅचमधील पर्यटकांचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वागत केले.
इतरांनाही पाहायला सांगू-
हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्याचा पहिला मान मिळणाऱ्या सिताराम शेट्टी यांनी म्हणाले, आमचे मुंबईच्या महापौरांनी स्वागत केले. मुंबई महापालिकेची इमारत पाहण्याची संधी मिळाली खूप आनंद वाटत आहे. माझ्या सहकाऱ्यांना ही इमारत पाहण्यास सांगू, असे शेट्टी म्हणाले. अर्चना अशोक नेवरेकर म्हणाल्या, इमारत पाहण्यास मिळत आहे याचा आंनद होत आहे. आम्ही हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्याचे आवाहन इतरांनाही करू.
आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा-
हेरिटेज वॉकच्या माध्यमातून मुंबईच्या जडण घडणीचा इतिहास जगापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आजपासून सुरू होणाऱ्या हेरिटेज वॉकला चांगला प्रतिसाद मिळाला असून दोन आठवड्याच्या बॅच फुल झल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
इतिहास जगापर्यंत नेण्याचा प्रयत्न
सव्वाशे वर्षांहून जुन्या असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या वास्तूची लोकांना माहिती असावी या दृष्टीने हेरिटेज वॉकची संकल्पना मांडण्यात आली. तेव्हाचा इतिहास बघण्यासारखा, शिकण्यासारखा आहे. मुंबईची जडणघडण कशी झाली, याचा इतिहास जगापर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातून जास्तीत जास्त पर्यटक येतील, अशी अपेक्षा असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
..या ठिकाणीही होणार हेरिटेज वॉक
मुंबई महापालिकेनंतर काळाघोडा येथील जुने सचिवालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालय, गेटवे ऑफ इंडिया, मुंबई विद्यापीठ आदी ठिकाणी हेरिटेज वॉक हा उपक्रम राबवला जाणार आहे. पोलीस महासंचालक कार्यालय व गेटवे ऑफ इंडिया येथील रस्ता सुट्टीच्या दिवशी बंद असतो. त्या ठिकाणी पोलिसांची शिफ्ट चेंज होताना 'मिटिंग द ट्रीट' हा १५ मिनिटांचा कार्यक्रम केला जाणार आहे. वानखडे स्टेडियम येथेही एक्सपिरियन्स टूर, मणिभवन, काँग्रेस भवन येथे फ्रिडम वॉक ही संकल्पना राबवली जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
दोन आठवड्याच्या बॅच फुल
पालिका मुख्यालयाच्या हेरिटेज वॉकसाठी प्रत्येकी ३०० रुपये तिकीट आकारण्यात येत आहे. प्रत्येक गटात १५ याप्रमाणे शनिवार, रविवारी पालिका मुख्यालय पर्यटकांना दाखविण्यात येणार आहे. सध्या ६ गटांचे बुकिंग झाले आहे.
१ फेब्रुवारीपासून मुंबईची लोकल सुरू होत आहे. इतर देशात शून्यावर गेलेला कोरोनाचा आकडा पुन्हा वाढला आहे. याची नोंद घेऊन मुंबईकरांनी काळजी घेतली पाहिजे. कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा- हेरिटेज वॉकच्या २ आठवड्याच्या बॅच फुल; आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा