मुंबई - विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्याा आहेत. त्यात अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. हे दिग्गज पुन्हा विधानसभेत जाणार की जनता त्यांना घरी बसवणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
राज्यात युती विरूद्ध आघाडी अशी सरळ लढत झाली. भाजप शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज निवडणूक मैदानात होते. त्यांचे काय होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
भाजपचे दिग्गज
परळी विधानसभा निवडणुकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यात पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यात जोरदार टक्कर होत आहे. दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या लढतीत कोणा बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
कर्जत जामखेड हा चुरशीतला मतदार संघ आहे. येथे भाजपच्या राम शिंदे यांच्या पुढे राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी चांगले आव्हान उभे केले आहे.
परिणय फुके हे सध्या राज्यमंत्री आहेत. ते साकोली मतदार संघातून निवडणूक लढत आहे. इथे त्यांच्या पुढे काँग्रेसच्या नाना पटोले यांनी आव्हान उभे केले आहे.
या नेत्यांच्या लढतीकडेही लक्ष
राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, रोहिणी खडसे, चंद्रकांत पाटील, सुधिर मुनगंटीवार, नितेश राणे
हेही वाचा - एक्झिट पोलमध्ये राज ठाकरेंना धक्का; मतदारांनी पुन्हा नाकारले?
शिवसेनेचे दिग्गज
ठाकरे कुटूंबातील कोणीतरी पहिल्यांदा निवडणूक लढत आहे. त्यामुळे वरळीत आदित्य ठाकरेंचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. विशेष आव्हान आदित्यंना या मतदार संघात नव्हते. मात्र त्यांना किती मताधिक्य मिळणार या बाबत उत्सुकता आहे.
सतिश सावंत यांना शिवसेनेने कणकवली मतदार संघातून उमेदवारी देऊ केली आहे. या निवडणुकीत सावंत यांनी भाजपच्यात नितेश राणे यांच्या पुढे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.
जयदत्त क्षिरसागर यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. ते बीडमधून निवडणूक लढत आहे. त्यांना त्यांच्याच पुतण्याकडून मोठे आव्हान आहे. त्यामुळे काका पुतण्याच्या लढाईत कोण जिंकणार याची उत्सुकता आहे.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये एमआयएम आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
काँग्रेस - राष्ट्रवादीचे दिग्गज
काँग्रेस राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. त्यात अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे. त्याच बरोबर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्या पुढे निवडून येण्याचे आव्हान आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील,धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक हे पुन्हा विधानसभेत जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.