मुंबई - विधानसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे, प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचत आहे. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अमित शाह, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवैसी या सारखी महाराष्ट्र आणि देशातील मातब्बर नेतेमंडळी रणधुमाळीत उतरली आहे. ठिकठिकाणी सभा, दौरे, जनसंपर्क अभियान, वेगवेगळे कार्यक्रम जवळपास दररोज आयोजित करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जळगाव व भंडारा येथे प्रचारसभा होत आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांचा आजचा (रविवार, 13 ऑक्टोबर) राजकीय दिनक्रम.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
जळगाव
युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची जळगावात रविवारी सकाळी 11.30 वाजता जाहीर सभा...
भंडारा
साकोली येथे सभा होणार आहे
- राहुल गांधी
लातूर
औसा येथे दुपारी 2 वाजता राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे
मुंबई
राहुल गांधी यांची धारावी येथे सभा
चांदिवली येथे दुसरी जाहीर सभा
- शरद पवार
जळगाव
आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथे रविवारी दुपारी 4 वाजता तसेच चाळीसगाव येथे सायंकाळी 6 वाजता सभा
- अमित शाह
पुणे
भाजप नेते अमित शहा यांचा पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे रोड शो आहे.
योगी आदित्यनाथ
यवतमाळ
उमरखेड मतदार संघातील उमेदवार नामदेव ससाणे यांच्या प्रचारार्थ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची 13 ऑक्टोबरला उमरखेड येथी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद ग्राउंड येथे जाहीर सभा
लातूर
उदगीर येथे दुपारी 2 वाजता योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे
हिंगोली
महायुतीचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रचारार्थ रविवारी (१३ ऑक्टोबर) हिंगोली येथे दुपारी साडेबारा वाजता योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा होणार आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बुलडाणा
दुपारी ०१.४५ वा. – सी.एस.कोठारी विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नांदुरा, जि. बुलढाणा येथे जाहीर सभा
दुपारी ०३.०५ वा. – सहकार विद्यामंदिर, वरकट बकाल, जि. बुलढाणा येथे जाहीर सभा
दुपारी ०४.२५ वा. – डॉ.बाबासाहेब आंबेडकर न.प. मैदान, खामगाव, जि. बुलढाणा येथे जाहीर सभा
- राज ठाकरे
मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा संध्याकाळी 6.30 वाजता दहिसर पुर्व येथे. तसेच दुसरी सभा सायंकाळी 7.30 वाजता शांताराम तलाव जवळ, मालाड पर्व,मुंबई येथे होणा आहेत.
- अमोल कोल्हे
सांगली
राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार प्रचारार्थ खासदार अमोल कोल्हे यांच्या सभा ,शिराळा ,इस्लामपूर आणि तासगाव
- प्रकाश आंबेडकर
बीड
बीड विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी सात वाजता बाळासाहेब आंबेडकर यांची बीड मध्ये जाहीर सभा होत आहे.
उस्मानाबाद
उद्या उस्मानाबाद जिल्ह्यात प्रकाश आंबेडकर येत आहेत
- सुप्रिया सुळे
उस्मानाबाद
सुप्रिया सुळे यांचा दौरा
- उद्धव ठाकरे
औरंगाबाद
११ वाजता रविवारी १३ ऑक्टोबर सिल्लोड येथे जिल्हा परिषद मैदान सिल्लोड येथे सभा
परभणी
13 ऑक्टोबर रोजी परभणीत शिवसेनेचे उमेदवार आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची दुपारी बारा वाजता सभा. सभा स्थळ - ज्ञानोपासक कॉलेज मैदान, जिंतूर रोड, परभणी
तसेच पालमगाव, गंगाखेड येथे देखील सेनेेचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे दुपारी १ वाजता सभा घेणार आहेत.
हिंगोली
कळमनुरी विधानसभा महायुतीचे उमेदवार संतोष बांगर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची रविवारी सायंकाळी 6 वाजता कळमनुरी येथे सभा होणार आहे. सभास्थल - बाजार समिती मैदान, बाळापूर
लातूर
लोहा संत गाडगेबाबा हायस्कूल, लोहा, दुपारी ३ वाजता
- एएमआयएमचे अध्यक्ष बॅरिस्टर असुदुद्दीन ओवैसी
जळगाव
एएमआयएमचे अध्यक्ष बॅरिस्टर असुदुद्दीन ओवैसी यांची रविवारी दुपारी 2 वाजता जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे जाहीर सभा