ETV Bharat / city

जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण; सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला ईडीची नोटीस

author img

By

Published : Jul 12, 2021, 6:36 AM IST

Updated : Jul 12, 2021, 10:01 PM IST

MAHARASHTRA BREAKING
MAHARASHTRA BREAKING

21:59 July 12

जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण; सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला ईडीची नोटीस

सिंधुदुर्ग - जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणानंतर आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला ईडीने नोटीस पाठवली आहे. तसेच ईडीने बँकेकडून सविस्तर माहिती मागवली आहे. 

20:16 July 12

पिंपरी-चिंचवडमध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला अटक; 32 लाखांच्या नोटा जप्त

पिंपरी-चिंचवड - पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. 32 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबई, गुजरात येथून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

19:56 July 12

गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्रात वाकून पाहताना महिलेचा अचानक तोल जाऊन ती पाण्यात पडली

मुंबई - समुद्रात  वाकून पाहताना एका महिलेचा अचानक तोल गेला आणि ती समुद्रात पडली. या महिलेचा जीव वाचवण्यासाठी एका 50 वर्षीय व्यक्तीने समुद्रात उडी टाकली. हा व्यक्ती गेट वेवर फोटो काढण्याचे काम करत असून गुलीबचंद गोंड असं त्याचं नाव आहे. तसेच यावेळी नागरिकांनी रस्सी आणि ट्यूब फेकून पाण्यात उडी टाकलेल्या व्यक्तीनं ते तिच्यापर्यंत पोहचवत तिला वाचवलं आहे. हा प्रकार मुंबईच्या गेट वे आँफ इंडिया येथे घडला आहे. 

19:19 July 12

भाजप माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढतंय - नाना पटोले

नागपूर - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लोणावळ्यात केलेल्या आरोपांनंतर राज्यात महाविकास आघाडीत वाद असल्याची चर्चा सुरू आहे. यावर मात्र नानांनी बाजू सावरून घेत, भाजप चुकीच्या गोष्टी पसरवत असल्याचा आरोप केला आहे. शिवाय वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचेही नाना पटोले यांनी नागपुरात सांगितले. 

17:38 July 12

नवापूर तालुक्यातील बेडकी पाडा येथील आरआर इनफॅक्ट कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट

नंदुरबार - नवापूर तालुक्यातील बेडकी पाडा येथील आरआर इनफॅक्ट कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट झाला. यात दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या प्लांटमध्ये जुने टायर जाळून त्यापासून केमिकल तयार केले जात होते. जखमी कामगारांना उपचारासाठी गुजरातमधील व्यारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

17:15 July 12

नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट; येत्या आठवड्यात पाऊस न पडल्यास दर बुधवारी पाणीपुरवठा बंद

नाशिक - नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली. त्यामुळे शहराला 40 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात पाऊस न पडल्यास शहरात दर बुधवारी संपूर्ण दिवस पाणी बंद ठेवत पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

15:45 July 12

जळगाव जिल्हा शिवसेनेतील गटबाजी उघड

जळगाव - जिल्हा शिवसेनेतील गटबाजी उघड झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील पारोळा येथे आयोजित केलेल्या शिवसंपर्क अभियान मेळाव्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दांडी मारली आहे. मेळाव्याला जळगावचे संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार चिमणराव पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, विष्णू भंगाळे आदींची उपस्थिती होती.  

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वीच आमदार चिमणराव पाटील यांनी आरोप करत आपल्याला पक्षात डावलले जात असल्याची खंत व्यक्त केली होती. आमदार पाटील यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेत खळबळ उडाली होती. त्यानंतर आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मेळाव्याला दांडी मारल्याने गटबाजीवर शिक्कामोर्तब झाला आहे.

15:41 July 12

चिंचणी समुद्रकिनारी धिंगाणा घालणाऱ्या मद्यपी पर्यटकांचा पोलिसांवर हल्ला

पालघर - चिंचणी समुद्रकिनारी धिंगाणा घालणाऱ्या मद्यपी पर्यटकांनी पोलिसांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

12:40 July 12

परमबीर सिंह यांची तब्येत ठिक नाही; ईडीकडे मागितला वेळ

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ईडीसमोर हजर राहण्यास आणखी काही कालवधी मागितला आहे. यासाठी त्यांनी तब्येतीचे कारण दिले असून शस्त्रक्रिया करायची असल्याचे म्हटले आहे. १००कोटी रुपये प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी ईडीने समन्स बजावले आहे.

11:34 July 12

महाराष्ट्र आणि केरळातील कोरोनाच्या परिस्थितीवर आमचे सातत्याने लक्ष - आरोग्य मंत्री भारती पवार

 केंद्रीय आरोग्य विभागाचे पथक कोरोनाच्या विरोधात राज्यपातळीवर जाऊन काम करत आहे. आम्ही कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत आणि कोरोनाची परिस्थिती संपत नाही तोवर महाराष्ट्र आणि केरळ राज्य सरकारकडून नियमित आढावा घेत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली 

10:43 July 12

राजापुरात मुसळधार पावासाने पूर सदृश्य परिस्थिती, नागरिकांना सतर्केता इशारा

रत्नागिरी-  जिल्ह्यात रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे राजापुरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी राजापूर शहरातील जवाहर चौकात आले आहे. सध्या येथील जवाहर चौकात तीन फुट पाणी साचले आहे. राजापूर नगर परिषदेने बाजारपेठेतील नागरिकांना सतर्कतेचा  इशारा दिला आहे. अर्जुना नदीचे पाणी बाजारपेठेत सामानाची हलवाहलव करण्यास व्यापाऱ्यांची सुरुवात झाली आहे.

10:41 July 12

देवेंद्रजी फडणवीस पारडी येथे ठवकर कुटुंबियांना देणार भेट; पोलिसाच्या मारहाणीत झाला होता मृत्यू

नागपूर-  मास्क-हेल्मेट न घातल्यामुळे पोलिसांनी केलेल्या मारहाणीत दिव्यांग मनोज ठवकर यांचा मृत्यू झाला होता. या विषयावर आमदार कृष्णा खोपडे यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना भेटून निवेदन दिले आहे. तसेच सदर घटनेची सविस्तर माहिती आमदार खोपडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन सविस्तर चर्चा केली. मृतक मनोज ठवकर यांचे मृत्यूला जबाबदार पोलीस कर्मचा-यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई आणि परिवाराला भरीव मदत देण्यास विनंती केली. त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ठवकर कुटुंबियांना भेट देणार असल्याचे सांगितले.  

10:09 July 12

मुंबईत १ कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थासह तस्कराला अटक; एनसीबीची कारवाई

09:25 July 12

सुनील शेट्टी राहत असलेली इमारत बीएमसीकडून सील; कोरोानबाधित रुग्ण आढळले

अभिनेता सुनील शेट्टी राहत असलेली पृथ्वी अपार्टमेंट इमारत पालिकेने सील केली आहे. त्या इमारतीमध्ये  5 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण मिळाल्याने इमारत सील करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील अल्टामाउंट रोडवर ही इमारत आहे. पण सुनील शेट्टी यांच्या घरचा कोणीही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नसल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

07:44 July 12

अमित शाह जी है या गब्बर सिंह? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा खोचक टोला

अमित शाह जी है या गब्बर सिंह? असा खोचक टोला काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी लगावला आहे. 

06:23 July 12

जातीनिहाय जनगणनेची गरज, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे वक्तव्य

 जातीनिहाय जनगणनेची गरज असल्याचे मत केंद्रीय सामाजिक व न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. जातीनिहाय जनगणनेमुळे समाजनिहाय लोकसंख्येची आकडेवारी समोर येईल. त्याचा सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असणाऱ्या गरजुना फायदा होईल,असेही आठवले म्हणाले.

06:08 July 12

Breaking Updates

जळगावात 1 कोटी रुपयांची दारू जप्त
जळगावात 1 कोटी रुपयांची दारू जप्त

जळगाव -  जिल्ह्यात अवैधरित्या करण्यात येत असलेल्या दारूच्या तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली.  या कारवाईत तब्बल १ कोटीचा दारूसाठा जप्त करण्याता आला आहे. एका ट्रकमधून या दारूची तस्करी केली जात असतानाही कारवाई करण्यात आली.
 
Last Updated : Jul 12, 2021, 10:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.