ETV Bharat / city

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त; ईडीची कारवाई - corona updates news

MAHARAHSTRA BREAKING
MAHARAHSTRA BREAKING
author img

By

Published : Jul 1, 2021, 7:46 AM IST

Updated : Jul 1, 2021, 11:58 PM IST

23:16 July 01

श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळ्यातील 18 वारकरी कोरोनाबाधित

आळंदी (पुणे) - श्री क्षेत्र आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान होण्याच्या अगोदर धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालखी सोहळ्यातील 18 वारकरी आणि एक देवस्थान कर्मचारी कोरोनाबाधित आढळला आहे. त्यामुळे श्री क्षेत्र आळंदी येथील पालखी सोहळ्याबाबत भीतीचे वातावरण आहे.

19:05 July 01

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त; ईडीची कारवाई

मुंबई : महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. अजित पवारांचे नातेवाईक राजेंद्र कुमार घाडगे यांच्या जलंद्रेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. 

18:52 July 01

अनिल देशमुख प्रकरण : कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना 5 दिवसांची ईडी कोठडी

मुंबई - अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना 5 दिवसांची ईडी कोठडी विशेष पीएमएलए कोर्टानं सुनावली आहे. सहा जुलैपर्यंत ईडी कोठडीत हे दोघे राहणार आहेत. 

18:47 July 01

नागपूर; प्रेम संबंधाच्या विरोधातून मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या

नागपूर - प्रेम संबंधाच्या विरोधातून मोठ्या भावाने लहान भावाची गळा चिरून हत्या केली.  नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील ही घटना आहे. गीतेश मानकर (२९) असे मृताचे नाव, तर सतीश मानकर असे आरोपीचे नाव आहे. 

18:42 July 01

कोस्टल रोडचा मार्ग मोकळा

मुंबई - कोस्टल रोडचं बांधकाम सध्या सुरू आहे. हायकोर्टात एक याचिका दाखल झाली होती. या याचिकेमुळं कोस्टल रोडच्या बांधकामाला अडथळा निर्माण झाला होता. बांधकामासाठी दक्षिण मुंबईतील टाटा गार्डन येथील झाडे तोडण्यास विरोध करणारी याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. विकासकामा दरम्यान अशा याचिका करुन अडथळा निर्माण करता येणार नसल्याचं कोर्टाकडून सांगत याचिका फेटाळून लावली आहे.  

17:08 July 01

सोलापुरातील राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयावर दगडफेक

सोलापूर - भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर दगडफेक झाली होती. त्यानंतर आज गुरुवारी दुपारी दोन युवकांकडून राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. दोन्ही युवक दगडफेक करून स्वतः फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे हजर झाले. रामलाल चौक(सोलापूर) येथील राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयावर ही दगडफेक करण्यात आली आहे. शरनू हांडे आणि सोमनाथ घोडके अशी अटक आरोपींची नावे आहेत.

16:38 July 01

पोलिसांच्या अंतरजिल्हा बदलीला ब्रेक!

मुंबई - आठ वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबईमध्ये काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या थांबल्या आहेत. कोरोना प्रादुर्भाव, मनपा निवडणूक आणि सणसमारंभ या पार्श्वभूमीवर बदल्यांचे आदेश पुढील सहा महिन्यांसाठी थांबवण्यात आले आहेत. मुंबईतल्या तब्बल 727 अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार होत्या त्या संदर्भात यादी देखील तयार करण्यात आली होती. 

15:41 July 01

अन्नदाता आणि डॉक्टर देवता असून, परिस्थितीत मदतीला धावले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई -  कृषी आणि डॉक्टर दिन हा योगायोग असून, दोन्ही आयुष्य वाचवणारे घटक आहेत. दोघांनी संकटाचा सामना केला, त्यामुळे सरकारवरील दपडण कमी झाले. कोरोनाने जग व्यापून टाकले आहे. सगळे उद्योग काहीकाळासाठी बंद केले. सर्वसामान्यांना घरी राहण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, डॉक्टर आणि शेतकरी घरी राहीले असते तर काय झाले असते? प्रतिकृती परिस्थितीमध्ये विक्रम केला आहे. त्याची तुलना अशावेळी होऊ शकत नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी आणि डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

11:34 July 01

कोरोना संसर्ग काळातील डॉक्टरांचे योगदान देश कृतज्ञतापूर्वक स्मरणात ठेवील - राज्यपाल

डॉ. बी. सी. रॉय यांच्या स्मरणार्थ साजरा होणाऱ्या राष्ट्रीय डॉक्टर दिवसाच्या सर्व डॉक्टर्सना मन:पूर्वक शुभेच्छा ! कोरोना संसर्ग काळातील आपले योगदान व सेवा देश नेहमी कृतज्ञतापूर्वक स्मरणात ठेवील, अशा शब्दात राज्यपाल कोश्यारी यांनी डॉक्टर्स दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

11:18 July 01

गॅस सिलिंडरच्या किमती भडकल्या; घरगुती सिलिंडर २५ रुपयांनी महाग

अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 25.50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सिलिंडरच्या किमती आता 834 रुपयांवर पोहचल्या आहेत. तसेच 19 kg च्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमध्येही 76 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये हा सिलिंडर आता 1,550 रुपयांना मिळणार आहे.

11:18 July 01

गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणी मारेकरी अब्दुल रौफची याचिका फेटाळली

गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणी हायकोर्टाचा फैसला, मारेकरी अब्दुल रौफची याचिका फेटाळली.  मुंबई सत्र न्यायालयानं रौफला दिलेली जन्मठेपेची शिक्षा योग्यच असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. गुलशन कुमार हे टी सिरीजचे संस्थापक आहेत. १२ ऑगस्ट १९९७ला त्यांची मुंबईतील जुहूमध्ये हत्या झाली होती.

09:17 July 01

कोवावॅक्स कोरोना लसीचे परीक्षण आधी प्रौढ व्यक्तींवर करा

सरकारच्या समितीने सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाला कोवावॅक्स या 2-17 वयोगटासाठी तयार करण्यात आलेली कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे परीक्षण आधी प्रौढ व्यक्तींवर करण्याचे सूचित केले आहे. याबाबत एएनआय या वृत्त संस्थेने सूत्रांचा दाखला देत ही माहिती दिली आहे.

09:01 July 01

तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही - निलेश राणे

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची सोलापुरात काच फोडण्यात आली. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकार व राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठा पराक्रम केला,  तर एवढे समजून चाला, की जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल, तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, तसेच हे लक्षात असू दे. तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, असा सूचक इशाराही माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे. 

08:41 July 01

पालघरमध्ये ३.६ तीव्रतेचा भूकंप

पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये आज सकाळच्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले. रिश्टर स्केलवर 3.6 इतक्या तीव्रतेची नोंद झाली असल्याची माहिती भूगर्भ विज्ञान विभागाकडून देण्यात आली आहे. आज सकाळी 7.07 वाजताच्या सुमारास हा भूकंप झाला.

07:55 July 01

उद्योजक अविनाश भोसले, अमित भोसले पिता पुत्रांना ईडीचे समन्स

पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले यांना ईडीने समन्स बजावले आहे. मनी लॉड्ररिंग प्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आले असून अविनाश भोसले यांना आज (गुरुवारी) चौकशीसाठी हजर राहण्याचे सूचित केले आहे. तर अमित भोसले यांना उद्या ईडी कार्यालयात हजर रहावे लागणार आहे.

06:09 July 01

एसटी बसने पालखी होणार पंढरपूरकडे मार्गस्थ

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरू तुकाराम महाराजांचा यंदाचा 336 वा पालखी प्रस्थान सोहळा आजपासून सुरू होत आहे. यंदा कोरोनामुळे राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे बसने पालखी पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही कडक निर्बंधांमध्ये प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. दुपारी 2 वाजता प्रत्यक्ष प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. दशमीपर्यंत पालखीचा मंदिरातच मुक्काम असणार आहे.

Last Updated : Jul 1, 2021, 11:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.