राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर
आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा स्थापना दिवस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( Nationalist Congress Party) हा भारताचा एक राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील प्रभावशाली पक्ष आहे. शरद पवार यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राष्ट्रवादीही भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिली. तर पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान कॉंग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाली होती.
प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्मदिवस
राहुल बजाज हे 'बजाज ग्रुप' उद्योग समूहाचे चेअरमन आहेत. त्यांना २००१ साली पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर त्यांना फ्रान्स सरकारने 'नाइट ऑफ द नेशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर' या सर्वोच नागरिक सन्मानानेही ते सन्मानित आहेत.
भोपाळमध्ये पूर्णपणे लॉकडाउन उठवले
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आजपासून पूर्णपणे लॉकडाउन उठवले आहे. तिथे आता शनिवारीही कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसणार आहेत.
आज वर्षातील पहिले सूर्यग्रहण -
आज वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. आज जगभरात सूर्यग्रहणाच्यावेळी रिंग ऑफ फायर चा दुर्लभ क्षण पाहायला मिळणार आहे. यावेळी सुर्य अंगुठी सारखा दिसणार आहे.