मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४६९५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५१२१० रूपये आहे. चांदीच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ५७२ रूपये आहे. (Gold, Silver price Updates). सोने आणि चांदीच्या दरामध्ये मुंबईत स्थिरता असलेली पाहावयास मिळत आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ५१०५० रुपये
- दिल्ली - ५१२१० रुपये
- हैदराबाद - ५१२१० रुपये
- कोलकत्ता - ५१२१० रुपये
- लखनऊ - ५१३६० रुपये
- मुंबई - ५१९१० रुपये
- नागपूर - ५१२४० रुपये
- पुणे - ५१२४० रुपये
देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ६३००० रुपये
- दिल्ली - ५७२०० रुपये
- हैदराबाद - ६३००० रुपये
- कोलकत्ता - ५७२०० रुपये
- लखनऊ - ५७२०० रुपये
- मुंबई - ५७२०० रुपये
- नागपूर - ५७२०० रुपये
- पुणे - ५७२०० रुपये
लवकरच होणार भाववाढ : परदेशातून सोने आयात करणे आता महाग झाले आहे. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 7.5 टक्क्यांवरून 12.50 टक्के केले आहे. सोन्याच्या वाढत्या आयातीला आळा घालण्यासाठी सरकारने ही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या घोषणेनंतर आता सोन्यावर 15 टक्के आयात शुल्क भरावे लागणार आहे. कारण 12.50 टक्के आयात शुल्काव्यतिरिक्त त्यावर 2.50 टक्के कृषी इंफ्रास्ट्रक्टर डेवलपमेंट सेसदेखील स्वतंत्रपणे आकारला जातो. त्यामुळे सोन्यावरील आयात शुल्क उपकर 10.75 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.
'अशी' ओळखा सोन्याची शुद्धता - सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
हेही वाचा : Petrol Diesel Rates : राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल- डिझेलच्या भावात घट.. पहा कुठल्या जिल्ह्यात आहेत किती दर?