ETV Bharat / city

शेतकरी दिल्लीची सीमा सोडणार नाहीत; कायदे मागे घ्यावेच लागतील - राकेश टिकेत - कोरोना लसीकरण अपडेट न्यूज

Big Breaking News
Big Breaking News
author img

By

Published : May 30, 2021, 6:38 AM IST

Updated : May 30, 2021, 12:26 PM IST

11:54 May 30

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान होऊन आज सात वर्षे पूर्ण झाली , त्यानिमित्ताने सेवा संघटन उपक्रम राबविण्यात येत आहेत. आज एक लाख गावात कोरोना योद्ध्यांचे सत्कार होणार, जिल्ह्यात चारशे गावात उपक्रम होणार असल्यची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

11:52 May 30

बाळासाहेब ठाकरे संजय राऊत यांना वरून थोबाडीत मारतील - चंद्रकांत पाटील

मोदींना आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे राऊत म्हणाले होते.  त्यावर चंद्रकांत पाटील यांच्याकडून राऊत यांचा समाचार घेण्यात आला. पंतप्रधान संजय राऊत यांची सूचना मान्य करतील, मी त्यांना निरोप देतो. मात्र, संजय राऊत यांनी हिंदूहृदय सम्राट यांच्या फोटो समोर बसावे, डोळे मिटून त्यांना विचारावे तुमचे मत काय? त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे राऊत यांना वरून थोबाडीत मारतील, असा घणाघणात चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

11:50 May 30

महाविकासआघाडीने इंधनावरील कर कमी करावेत; चंद्रकांत पाटील

जागतिक स्तरावर भाव वाढले की देशात पेट्रोलचे दर वाढतच राहतात. दर कमी करायचे असतील तर जागतिक स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. मात्र ते शक्य नाही. राज्य व केंद्र सरकारने कर कमी केली पाहिजे, महाविकास आघाडीने कर कमी केले तर राज्यात इंधनाचाे दर कमी होतील, असे मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

11:48 May 30

महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचे गाभींर्य नाही - चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडी सरकारला प्रश्नांची खोली व जाणीव नाही, ते वरवर प्रयत्न करत आहेत. सुप्रीम कोर्टाने वैतागून हा निर्णय दिला आहे. महाविकास आघाडीचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही म्हणून हा कोर्टाने निकाल दिला आहे. केंद्रावर दोष ढकलून चालणार नाही,  लोकांना सर्व काही कळत आहे, लोक त्यांची नाराजी निवडणुकीत दाखवतील, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

11:44 May 30

अजित दादा जरा सांभाळून बोला,आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत - चंद्रकांत पाटील

अजित पवार यांच्यावर उभारून बोलता येणार नाही, त्यांच्यावर सविस्तर बोलायला पाहिजे. अजित दादा झोपेत सरकार तुम्ही आणले, पवार साहेब पण झोपेतून उठायचं होते त्यावेळी तुम्ही शपथविधी पार पाडला. त्यामुळे झोपेत कसं सरकार आणायचे हे अजित पवार यांना माहिती आहे. अजित पवार यांच्यासारखे दीर्घकाळ सत्तेत असणारे नेते यांना आपण काल काय केले याची आठवण राहत नाही, त्यामुळे ज्यांच्या मांडीला मांडी लावून तीन दिवसाचे सरकार केले, त्यांच्यावर टीका करताना अजित पवारांनी विचार करून बोलावे, असे सडेतोड प्रत्युत्तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्या टीकेला दिले आहे.

आम्ही तुम्हाला तलवार लावून आणून उभे केले होते का? तुम्हाला आठवीस आमदार सोबत ठेवता आले नाहीत, ते पवार साहेबांच्याकडे पळून गेले. तुम्ही आमच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व महाविकासमध्ये उपमुख्यमंत्री, उद्या तिसऱ्याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हाल, मात्र तुम्ही सर्वत्र पाहिजेत, तुम्हाला तत्व,व्यवहार , सांगड नाही, तुमचे फक्त एकच तत्व आहे, ते म्हणजे ज्याचे सरकार त्यांच्यासोबत मी जाणार अशी टीकाही पाटील यांनी अजित पवार यांच्यावर केली

11:43 May 30

हम को मन की शक्ती देना,मन विजय करे"

कोरोनामुळे तयार झालेल्या निराशाजनक वातावरणातून नागपूरकरांना बाहेर काढण्यासाठी काही जेष्ठ कलाकारांसह नागपूरकरांनी एकत्र येत येत एका सुंदर निर्मिती केली आहे.  "हम को मन की शक्ती देना,मन विजय करे" या अजरामर गीताच्या माध्यमातून नागपूरकरांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  

11:09 May 30

अनेक लोकांनी युद्धपातळीवर काम करून हजारो-लाखों लोकांचे प्राण वाचवले - पंतप्रधान मोदी

ज्यावेळी दुसरी लाट आली, त्यावेळी अचानक ऑक्सिजनची मागणी अनेक पटींनी वाढली त्यामुळे खूप मोठे आव्हान निर्माण झाले. वैद्यकीय प्राणवायू देशाच्या अगदी लहान लहान गावांतल्या भागांपर्यंत पोहोचवणे हे एक मोठे आव्हान होते. मात्र, देशासमोर आलेल्या आव्हानामध्ये देशाला मदत केली ती, क्रायोजेनिक टँकर चालविणा-या चालकांनी, ऑक्सिजन एक्सप्रेसने आणि हवाई दलाच्या वैमानिकांनी. अशा अनेक लोकांनी युद्धपातळीवर काम करून हजारो-लाखों लोकांचे प्राण वाचवले - पंतप्रधान मोदी

11:09 May 30

या वादळी संकटामध्ये ज्यांना आपल्या जवळच्या लोकांना गमवावं लागलं, त्यांच्याविषयी मी आपल्या सहसंवेदना व्यक्त करतो. या संकटामध्ये ज्यांना नुकसान सोसावं लागतंय, त्या सर्वांच्याबरोबर आम्ही सर्वजण अगदी ठाम उभे आहोत.

11:04 May 30

काही वर्षांपू्र्वीच्या तुलनेत भारताने अनेक नैसर्गिक संकटांचा सामना दृढतेने केला - पंतप्रधान मोदी

पश्चिमी किनारपट्टीवर ‘तौक्ते’ आणि पूर्व किनारपट्टीवर ‘यास’ चक्रीवादळं येवून गेली. या दोन्ही चक्रीवादळांनी अनेक राज्यांवर परिणाम केला आहे. देश आणि देशाची जनता संपूर्ण ताकदीनिशी या संकटाशी झुंजली आणि कमीतकमी जीवितहानी सुनिश्चित केली. काही वर्षांपूर्वी अशा नैसर्गिक संकटांमध्ये होणा-या जीवितहानीच्या तुलनेत आता जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचवले जावू शकतात, याचा अनुभव आपण सगळे घेत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

10:07 May 30

आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी मुंबईत पेट्रोल 100 पार

आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटरला 100 रुपयांच्या पुढे गेला आहे. मुंबईत आज  पेट्रोल 100.23 रुपये प्रती लिटर, तर डिझेल 92.21 रुपये प्रति लिटर

09:59 May 30

कोरोना विरोधात लढण्यासाठी महिन्यातून एकदा बोलने निरर्थक; 'मन की बात'वर राहुल गांधींचा निशाणा

देशातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या मन की बात या कार्यक्रमावर पंतप्रधान मोदींचे नाव न घेता टीका केली आहे. कोरोना विरोधात लढण्यासाठी नियत, निती आणि निश्चयाची गरज आहे, महिन्यातून एकदा बोलणे हे निरर्थक असल्याची टीका राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केली आहे.

09:24 May 30

पंतप्रधान मोदी देशापेक्षा मोठे नाहीत - खासदार ओवैसी

नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीमुळे कोरोनाची दुसरी लाट आली. आज त्यांच्या चुकीमुळे अनेक जण बेबारस झाले अनेकांचे मृत्यू झाले याला फक्त नरेंद्र मोदी जबाबदार असल्याची टीका एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवैसी यांनी टिट्वरवरून केली आहे.

09:22 May 30

शेतकरी दिल्लीची सीमा सोडणार नाहीत; कायदे मागे घ्यावेच लागतील - राकेश टिकेत

शेतकरी दिल्लीची सीमा सोडणार नाही, तो फक्त एकाच अटीवर माघारी परतेल, जेव्हा तीन काळे कृषी कायद रद्द होतील आणि एमएसपीवर कायदा होईल

08:23 May 30

सेंट्रल विस्टा प्रोजक्टसंदर्भात सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी

दिल्ली उच्च न्यायालय सध्याच्या कोरोना काळात नवीन संसदभवन म्हणजेच सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम सुरू ठेवण्याची परवानगी द्यायची का नाही, याबाबत सोमवारी सुनावणी करणार आहे. सेंट्रल विस्टा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.

07:37 May 30

पालघर किनारपट्टीवर अरबी समुद्रात जहाजातून तेल गळती

 अरबी समुद्रात पालघर किनारपट्टीवर एका जहाजातून तेल गळती झाल्याचे समोर आले आहे.  तौक्ते वादळाच्या तडाख्यात हे जहाज एका खडकावर आदळल्याने अडकून पडले होते. त्यानंतर या जहाजातून तेल गळती सुरू झाली आहे.

07:35 May 30

पश्चिम बंगालमध्ये बाबा रामदेव विरोधात तक्रार दाखल, आयएमएने केली तक्रार दाखल

07:24 May 30

फरार मेहुल चोक्सीला अटकेवेळी मारहाण; जखमेचे फोटो आले समोर

पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला डॉमिनिका मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर चोक्सीला कारागृहात टाकल्यानंतरचे काही फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये महुल चोक्सीला अटक करताना मारहाण झाली असल्याचा आरोप त्याचे वकील मार्श यांनी केला आहे. 

06:51 May 30

मुंबईतील दुकाने 1 जूनपासून सम-विषम पद्धतीने उघडणार

मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यासाठी 14 एप्रिलपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनमधून शिथिलता दिली जाणार आहे. सध्या सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू आहेत. 1 जूनपासून इतर दुकाने सुरू करण्याची परवानगी देताना सम विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली जाईल अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. यामुळे दुकानदारांना दिलासा मिळणार आहे. तर राज्यात आणखी १५ दिवस लॉकडाऊन लावण्याची गरज असल्याचे मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले होते. याबरोबरच त्यांनी ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या कमी आहे तेथील नियमात शिथिलता देण्यात येईल असेही स्पष्ट केले होते

06:01 May 30

पंतप्रधान मोदींची आज मन की बात;  रेडिओवरून देशाला करणार संबोधित 

Last Updated : May 30, 2021, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.