ETV Bharat / city

पंतप्रधानांच्या नाटकबाजीमुळेच भारतात कोरोनाची दुसरी लाट - राहुल गांधी - महाराष्ट्र कोरोना लसीकरण

Big Breaking
Big Breaking
author img

By

Published : May 28, 2021, 6:52 AM IST

Updated : May 28, 2021, 1:41 PM IST

13:40 May 28

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत, अंतर्गत मूल्यमापन होणार

13:14 May 28

मुंबई उच्च न्यायालयाचे दहा अतिरिक्त न्यायाधीश, झाले स्थायी न्यायाधीश

नियुक्त न्यायाधीशांची नावे

  • न्यायमूर्ती अविनाश गुणवंत घरोटे
  • न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सूर्यवंशी,
  • न्यायमूर्ती अनिल सत्यविजय किलोर,
  • न्यायमूर्ती मिलिंद नरेंद्र जाधव,
  • न्यायमूर्ती मुकुंद गोविंदराव सेवलीकर,
  • न्यायमूर्ती वीरेंद्रसिंह ज्ञानसिंह बिष्ट
  • न्यायमूर्ती देबद्वार भालचंद्र उग्रसेन
  • न्यायमूर्ती मुकुलिका श्रीकांत जावळकर
  • न्यायमूर्ती सुरेंद्र पंढरीनाथ तावडे
  • न्यायमूर्ती नितीन रुद्रसेन बोरकर

13:07 May 28

नागरिकांना लस नाही मिळाल्यास कोरोनाची तिसरी लाट भयानक असेल - राहुल गांधी

भाजपाचे लोक म्हणतात की राहुल गांधी लोकांना घाबरवत आहेत. मात्र, मी भीती निर्माण करत नसून लोकांना सतर्क करून वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जनतेला कोरोनाची लस लवकरात लवकर नाही मिळाली तर कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा भयानक असेल. 

13:02 May 28

तर संपूर्ण देशात लसीकरण होण्यासाठी २०२४ उजडेल

देशात जर याच वेगाने लसीकरण चालू राहिले, तर देशात संपूर्ण लसीकरण व्हायला 2024 उजाडेल.  लसीकरण नाही झालं तर तिसरी.. चौथी.. पाचवी.. अशा कोरोनाच्या लाटा येतच राहतील. कोरोनाचा विषाणू त्याचे रूप बदलत राहील, असा इशारा राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

12:34 May 28

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर; १५ दिवसाच्या लॉकडाऊनची गरज - आरोग्यमंत्री

राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के इतके झाले आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लॉकडाऊन संदर्भात चर्चा झाली,त्यामध्ये राज्यात आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढवण्याची गरज आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. त्या ठिकाणी लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथीलता देणे गरेजेचे आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

12:05 May 28

सुशांतसिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला एनसीबीकडून अटक

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग सिंडिकेट बाबतीत तपास सुरू आहे. या तपास प्रक्रियेत सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी या आरोपीला अमली पदार्थ तस्करीसंदर्भात एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. पिठाणीला हैदारमधून अटक करण्यात आली आहे. 
 
11:31 May 28

पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशामध्ये दाखल, यासच्या नुकसानीचा आढावा बैठक घेणार

11:25 May 28

शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकेत यांना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली - कृषी कायद्याविरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणारे आणि भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. टिकेत यांना अज्ञात व्यक्तीने मोबाइलवर कॉल करून ही धमकी दिली आहे. या प्रकरमी कौशांबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

10:44 May 28

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रभक्ती प्रेरणादायी आहे - मुख्यमंत्री ठाकरे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रभक्ती प्रेरणादायी आहे. उत्तम संघटक, साहित्यिक–प्रतिभावंत अशा या भारतमातेच्या थोर सुपुत्राला, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. - मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

10:39 May 28

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेच्या संदर्भातील सुनावणी सोमवारी; सर्वोच्च न्यायालय

CBSE च्या परीक्षा रद्द करण्याच्या बाबतच्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवार ३१ मे पर्यंत पुढे ढकलली.  याचिकाकर्त्यास याचिकेची प्रत CBSE च्या वकिलाकडे सोपवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका

10:35 May 28

राहुल गांधी यांची आज पत्रकार परिषद

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज माध्यमांशी संवाद साधणार आहेत. दुपारी 12 वाजता ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते पत्रकारांशी संवाद साधतील

10:32 May 28

कोरोना संबंधित औषधावरील जीएसटी रद्द करा; प्रियांका गांधींची मागणी

कोरोना विरोधात लढा देत असताना त्यासंबंधित आरोग्य उपकरणे आणि औषधावरील जीएसटी रद्द करावी, अशी मागणी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

09:49 May 28

नागपुरात बाल विवाह रोखण्यात यश;  नवीन कामठी पोलिसांची कारवाई

09:35 May 28

देशात कोरोनाचे 1 लाख 86 हजार नवीन बाधित

गुरुवारी देशात कोरोनाचे 1 लाख 86 हजार नवीन बाधित रुग्णांची भर पडली आहे. देशात  44 दिवसांनंतर कोरोना व्हायरसने बाधितांचा आकडा कमी दिसून आला. गेल्या 24 तासात 2,59,459 रुग्ण ठिक झाले आहेत. तर 3 हजार 660 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

09:04 May 28

पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल, ओडिशाच्या दौऱ्यावर; चक्रीवादळ यासमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. यास चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये १ कोटी जनता प्रभावित झाली होती. तर ३ लाख घरांचे नुकसान झाले होते. पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्यात मोदी नुकसान भरपाई म्हणून मदत जाहीर करणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्र्र्र, कर्नाटक, गोवा राज्यालाही तौक्ते चक्रीवादळचा फटका बसला होता. मात्र, मोदींनी गुजरात व्यतिरिक्त कोणत्याही राज्याला आर्थिक मदत जाहीर केली नाही.

08:38 May 28

भरतपूरच्या खासदार कोली यांच्यावर दगडफेक; जमखी अवस्थेत रुग्णालयात दाखल

राजस्थानमधील भरतपूरचे भाजपा खासदार रंजीता कोली दगडफेकीमध्ये जखमी झाल्या आहेत. त्यांना रात्री उशिरा  रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर कोली यांनी जिल्हाधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी फोन उचलला नसल्याचा आरोप केला आहे.

07:47 May 28

खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्र्यांना भेटणार; मराठा आरक्षणाबाबत भूमिकाही करणार स्पष्ट

मुंबई - मराठा आरक्षण प्रश्नी संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी शरद पवार आणि राज ठाकरे यांची भेट घेतली.  यावेळी त्यांनी राज ठाकरे हे जात पात मानत नाहीत. त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. पण गरीब आणि गरजू मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका असल्याची प्रतिक्रिया दिली. दरम्यान, संभाजीराजे आज दुपारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.  त्यानंतर मराठा आरक्षणाबाबतच्या लढ्याबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहेत. तसेच ते शनिवारी प्रकाश प्रकाश आंबेडकरांची देखील भेट घेणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

07:11 May 28

स्वत:चा स्वार्थ साधणारे लोकचं लक्षद्वीप प्रशासनाविरोधात चुकीचा प्रचार करत आहेत -कलेक्टर आस्कर अली

लक्षद्वीपचे कलेक्टर आस्कर अली यांनी लक्षद्वीपमधील प्रशासक पटेल यांच्या निर्णयांची पाठराखण करत तेथील नागरिकांवर आरोप केले आहेत. स्वस्वार्थ साधणारे काही लोक प्रशासनाविरोधात अपप्रचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तेच लोक सध्या प्रशासनाच्या प्रस्तावास विरोध करत असल्याचेही ते म्हणाले. 

07:04 May 28

मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून फायझर, अस्ट्रॅझेनेकाची माघार

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण मोहिमेत अडथळे येत आहेत. त्यासाठी मुंबई महापालिकेने 1 कोटी लसीच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी 8 पुरवठादारांनी प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र या प्रक्रियेतून कोणतेही कारण न देता फायझर,अस्ट्रॅझेनेका कंपनीने ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून माघार घेतली आहे. यामुळे इतर 7 पुरवठादारांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती पालिकेचे विशेष उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली. 

06:57 May 28

पत्रकारांसाठी तेलंगणा सरकार राबवणार विशेष कोरोना लसीकरण मोहीम

तेलंगणा राज्य सरकार राज्यातील सर्व अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाठी विशेष कोरोना लसीकरण मोहीम राबवणार आहे; 28 मे आणि 29 मे दोन दिवस चालणार मोहीम

06:45 May 28

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या प्रशानसानातील वरिष्ठ अधिकाऱ्याची घेतली भेट; इंडो पॅसिफिक, अफगानिस्तान ट्रिप्स करारावर केली चर्चा

06:07 May 28

जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर येथे केमीकल कंपनीला भीषण आग

जम्मू काश्मीरमधील उधमपूर येथील एका रसायन फॅक्टरीला आग लागल्याची घटना घडली आहे.  भारतीय वायू दलाकडून ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. आग विझवण्याचे काम अद्याप सुरू असून आग आटोक्यात आली नसल्याची माहिती वायू दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. ही आग गुरुवारी मध्यरात्रीनंतर लागली आहे,

Last Updated : May 28, 2021, 1:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.