ETV Bharat / city

BREAKING NEWS: नवाब मलिक यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल - नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार दाखल

क्रूझ ड्रग्ज पार्टीतील साक्षीदार प्रभाकर साईलचा आज जबाब नोंदवण्यात येणार

author img

By

Published : Nov 8, 2021, 7:32 AM IST

Updated : Nov 8, 2021, 11:51 PM IST

23:48 November 08

नवाब मलिक यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

मुंबई - नवाब मलिक यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये समीर वानखडे यांचे वडील ज्ञानदेव वानखडे यांनी तक्रार दाखल केली आहे. 

21:25 November 08

अहमदनगर-जिल्हा रुग्णालय दुर्घटना- शासनाच्या आरोग्य विभाकडून गंभीर दखल

अहमदनगर-जिल्हा रुग्णालय दुर्घटना- शासनाच्या आरोग्य विभाकडून गंभीर दखल  जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे खालील प्रमाणे कारवाई..

1. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा - निलंबित

2. डॉ.सुरेश ढाकणे -  वैद्यकीय अधिकारी - निलंबित

3. डॉ. विशाखा शिंदे - वैद्यकीय अधिकारी - निलंबित

4.  सपना पठारे - स्टाफ नर्स - निलंबित

5. आस्मा शेख - स्टाफ नर्स - सेवा समाप्त

6. चन्ना आनंत - स्टाफ नर्स - सेवा समाप्त

15:51 November 08

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार; भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

Jalgaon breaking

जळगाव - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूक रिंगणातून भाजपच्या सर्वच उमेदवारांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांची बॅंक असून याठिकाणी शेतकऱ्यांना प्रतिनिधीत्व मिळावे. तसेच महाविकास आघाडीने केलेल्या दगाबाजीचा निषेध म्हणून भाजप ही माघार घेत असल्याचे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी सांगितले.

15:50 November 08

लस घेतली नाही तर पालिका कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही

Thane breking

लस घेतली नाही तर पालिका कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही.

ठाणे महापौर नरेश म्हस्के यांचा निर्णय.

पहिला डोस घेतल्याचे सर्टिफिकेट दाखवाल्या नंतरच वेतन मिळणार.

12:55 November 08

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गीताचे अनावरण

नाशिक - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गीताचे अनावरण

गीतकार मिलिंद गांधी यांच्या शब्दरचनेला संगीतकार संजय गीते यांनी स्वरबद्ध केले आहे.  

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत गीताचे अनावरण करण्यात आले.  

12:08 November 08

पंढरपूर पालखी मार्गाचे चौपदरीकरण भूमिपूजन व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

मुंबई - पंढरपूर पालखी मार्गाचे चौपदरीकरण भूमिपूजन व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा.  

दुपारी साडेतीन वाजता होणार लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे राहणार उपस्थित

11:46 November 08

भाजप नेते किरीट सोमैया यांच्यावर आज नागपूर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल होणार

मुंबई -  भाजप नेते किरीट सोमैया यांच्यावर आज नागपूर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल होणार आहे. नागपूर जिल्हा न्यायालयात दुपारी १२.३० वाजता याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्विट करुन दिली आहे. 

11:39 November 08

माजी गृहमंत्री पुन्हा ईडी कोठडीत, मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता आदेश

 मुंबई - अनिल देशमुख यांचा ताबा पुन्हा ईडी अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ईडी अधिकाऱ्यांनी अनिल देशमुख यांना अर्थर रोड तुरुंगातून ताब्यात घेतले आणि त्यांना ईडी कार्यालायत आणले आहे.  

10:35 November 08

नोटाबंदी बद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मागावी - संजय राऊत

मुंबई - नोटाबंदीला आज पाच वर्षे होत आहेत. दहशतवाद, काळा पैस आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी नोटा बंदी करत असल्याचा दावा तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. मात्र, आज काश्मीर मध्ये सगळ्यात जास्त दहशतवाद वाढला आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा देशात वाढलेला आहे. नोटाबंदी पूर्णपणे अपयशी ठरली असल्याचा टोला शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. आर्थिक दृष्ट्या ज्याला आपण डिझास्टर म्हणतो, असा प्रकार या नोटाबंदी मुळे घडला असल्याचे राऊत म्हणाले.

शेकडो लोकांना या नोटबंदीमुळे प्राण आणि नोकऱ्या गमवाव्या लागल्या. नोटाबंदी बद्दल केंद्र सरकारने खरंतर देशाची माफी मागायला हवी, असे संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.  

10:15 November 08

सीआरपीएफ जवानाचा सहकारी जवानांवर गोळीबार; चार जवान ठार, तिघे गंभीर जखमी

रायपूर - छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) शिबीरात एका जवानाने आपल्या साथीदारांवर गोळीबार केला आहे. यात चार जवानांचा मृत्यू झाला आहे, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.  

पोलीसांनी जवानाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. चौकशीनंतरच गोळीबाराचे कारण समोर येईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

10:11 November 08

नवाब मलिक यांचे आणखी एक ट्विट

  • Sameer Dawood Wankhede, is your sister-in-law Harshada Dinanath Redkar involved in the drug business ?
    You must answer because her case is pending before the Pune court.
    Here is the proof pic.twitter.com/FAiTys156F

    — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 8, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

 क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबी मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आज नवाब मलिक यांनी आणखी एक ट्विट केले आहे. समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ही ड्रग्ज गोरख धंद्यात सहभागी असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. यासंदर्भातील खटला पुणे न्यायालयात प्रलंबित असल्याचे नवाब यांनी ट्विट करून सांगितले. यावरून त्यांनी समीर यांना जाब विचारला आहे. 

09:41 November 08

येवल्यातील एसटी कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर; एसटी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल

येवला (नाशिक) - महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपानुसार येवला आगारातील कर्मचारी मध्यरात्रीपासून संपात सहभागी झाले आहेत.  यामुळे येवला आगारातून एकही बस बाहेर पडलेली नाही. बस वाहतूक ठप्प झाल्याने ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होत आहेत. सुटीनिमित्त गावी आलेल्या प्रवाशांना शहरात जाण्यास अडचणी येत आहेत. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य असल्याने प्रवाशी देखील कर्मचाऱ्यांसोबत असल्याचे चित्र येवल्यात  दिसून येत आहे.

07:04 November 08

MAHARASHTRA BREAKING LIVE : नवाब मलिकांचे आणखी एक ट्विट; समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा रेडकर ड्रग्ज धंद्यात असल्याचा आरोप

मुंबई - मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय या प्रकरणातील एक पंच प्रभाकर साईल याने एक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल करुन वानखेडे यांच्यावर 25 कोटीच्या लाचखोरीचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणी समीर वानखेडे यांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली होती. याप्रकरणाती चौकशीसाठी क्रूझ ड्रग्ज पार्टीतील एक पंच साक्षीदार प्रभाकर साईल याला समन्स बजावण्यात येणार आहे.  यासाठी एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह दिल्ली विमानतळावरून मुंबईला रवाना झाले.

Last Updated : Nov 8, 2021, 11:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.