मुंबई - आज राज्यात २ हजार ८४० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १७ लाख ५२ हजार ५०९ वर पोहचला आहे. राज्यात आज ६८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६ हजार १०२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : शिक्षण सचिवांना आली जाग; आज काढले कोरोना चाचणीच्या जबाबदारीचे पत्रक
८१ हजार ९२५ अॅक्टिव्ह रुग्ण -
राज्यात आज ५ हजार १२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आजपर्यंत एकूण १६ लाख २३ हजार ५०३ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.६४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ६८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९८ लाख ४७ हजार ४७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ५२ हजार ५०९ नमुने म्हणजेच १७.८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ७ लाख ९१ हजार १२० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर ५ हजार ३६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ८१ हजार ९२५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा - एकनाथ शिंदे झाले पदवीधर.. नाशिक मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्ष पदवी परीक्षेचे निकाल जाहीर
कधी किती रुग्ण आढळून आले -
राज्यात जून दरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९, १० नोव्हेंबरला ३,७९१, १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५ तर १७ नोव्हेंबरला २,८४० रुग्ण आढळून आले आहेत.