मुंबई - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी साधेपणाने पार पडलेल्या या समारंभात दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे, मुंबई विभागीय उपाध्यक्ष नरेंद्र राणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गटनेत्या राखी जाधव, मुंबई विभागीय युवती अध्यक्षा अदिती नलावडे, मुंबई विभागीय विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अमोल मातेले, चिटणीस संजय बोरगे, सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, युवक जिल्हाध्यक्ष सचिन नारकर, कुलाबा तालुकाध्यक्ष मनोज आंब्रे तसेच पक्षाचे इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिंदी भाषिक विभागाकडून लॉकडाऊन काळात शहरातील गरजू आणि गरीब जनतेला विविध माध्यमातून मदतीचा हात पुढे करण्यात आला. या मदतीचा माहिती अहवाल मुंबई विभागीय हिंदी भाषिक अध्यक्ष मनिष दुबे यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे सुपूर्द केला.