ETV Bharat / city

खासदार धोत्रे यांचे घर आणि अकोला पूर्णा रेल्वेला बॉम्बने उडवण्याची धमकी - अकोला पूर्णा एक्सप्रेस बॉम्ब धमकी

माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार संजय धोत्रे यांच्या ( Bomb threat to mumbai police ) घरावर बॉम्ब टाकून उडवण्याची धमकी ( MP Dhotre house bomb threat ) आणि अकोला पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वेला ( Threats to blast Akola Purna Railway ) देखील बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला आला आहे.

MP Dhotre
खासदार धोत्रे
author img

By

Published : Jul 27, 2022, 1:47 PM IST

मुंबई - माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार संजय धोत्रे यांच्या ( Bomb threat to mumbai police ) घरावर बॉम्ब टाकून उडवण्याची धमकी ( MP Dhotre house bomb threat ) आणि अकोला पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वेला देखील बॉम्बने उडवण्याची ( Threats to blast Akola Purna Railway ) धमकी देणारा फोन मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला आला आहे. हा फोन कॉल मंगळवारी रात्री आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी तात्काळ अकोला पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली आहे. पोलिसांनी संजय धोत्रे आणि अकोला पूर्णा पॅसेंजरची पाहणी केली आहे.

हेही वाचा - Umesh Kolhe Murder case : उमेश कोल्हे खूनातील आरोपीला आर्थर रोड कारागृहात मारहाण

बॉम्‍बसदृष्‍य कोणतीही गोष्‍ट आढळून आली नाही - अकोला पोलिसांनी रेल्वे पोलिसांसह मंगळवार रात्री 10 वाजून 40 मिनिटांपर्यत संपूर्ण रेल्वेची तपासणी केली आहे. रेल्वेतील प्रवाशांचीही तपासणी केली. मात्र, यामध्ये काहीच आढळून आले नाही. यावेळी खासदार संजय धोत्रे यांच्या घराचीही तपासणी केली. मात्र, यामध्ये बॉम्‍बसदृष्‍य कोणतीही गोष्‍ट आढळून आली नाही. त्‍यामुळे, ही फक्‍त अफवाच असल्‍याचे समोर आले आहे.

मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल आला की, अकोला येथील रेल्वे स्टेशनवर रात्री 9.30 वाजता येत असलेल्या अकोला पूर्णा सुपरफास्ट पँसेजर रेल्वेमध्ये व भाजपा नेते संजय धोत्रे यांच्या घरी बाँब ठेवण्यात आला आहे. तात्काळ मुंबई पोलिसांनी ही माहिती अकोला पोलिसांना दिली. त्यानंतर अकोला पोलीस व रेल्वे पोलीस अर्लट झाले.

संजय धोत्रे यांच्या रामनगरातील घराची सुरक्षा वाढवली - रेल्वे स्टेशनवर बॉम्‍ब शोधक पथकासह पोलीस पोहचले. रेल्वे स्टेशनवर आलेल्या गाड्यांची संपूर्ण तपासणी केली. दरम्यान याच वेळी माजी मंत्री संजय धोत्रे यांच्या घराची तपासणी करण्यात आली. मात्र, पोलिसांना यामध्ये काहीच आढळून आले नाही. त्यामुळे, रेल्वे गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. बॉम्बची अफवा ठरल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. इकडे सतर्कता म्हणून अकोला पोलिसांनी खासदार संजय धोत्रे यांच्या रामनगरातील घराची सुरक्षा वाढवली होती. बॉम्बच्या अफवेबाबत आलेला कॉल कोठून आला होता, याचा तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा - प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांच्या प्रकृतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विचारपूस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.