ETV Bharat / city

दिल्ली दंगलग्रस्तांसाठी राज्यातून सरसावले हजारो मदतीचे हात - thousands people helped Riot victims in Delhi

स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाने (एसआयओ) या स्वयंसेवी संस्थेने राज्यभरात मदतीची मोहीम राबविली असून मागील दोन दिवसात 20 लाखांहून अधिक रुपयांचा निधी गोळा करून दिल्लीतील दंगलग्रस्तांना पाठविण्यात आली असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.

दिल्ली दंगलग्रस्तांसाठी राज्यातून सरसावले हजारो मदतीचे हात

author img

By

Published : Mar 8, 2020, 2:37 AM IST

मुंबई - दिल्लीतील दंगलग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्यभरातून हजारो हात सरसावले आहेत. स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाने (एसआयओ) या स्वयंसेवी संस्थेने राज्यभरात मदतीची मोहीम राबविली असून मागील दोन दिवसात 20 लाखांहून अधिक रुपयांचा निधी गोळा करून दिल्लीतील दंगलग्रस्तांना पाठविण्यात आली असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली. येत्या काही दिवसांमध्ये आणखी निधी जमा करून तो दिल्लीला पाठवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

दिल्ली दंगलग्रस्तांसाठी राज्यातून सरसावले हजारो मदतीचे हात
दिल्लीत झालेल्या दंगलीत सर्वाधिक नुकसान हे मुस्लिम आणि त्यानंतर हिंदू समाजातील लोकांचे झाले आहे. शेकडो लोकांचे घरे उध्वस्त झाली असून सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत अद्यापही अनेकांपर्यंत पोचली नाही, यामुळे दिल्लीतील सर्वधर्मीय दंगलग्रस्त लोकांना मदत मिळावी मिळावी म्हणून आम्ही एसआयओकडून मुंबई, औरंगाबाद, परभणी, नांदेड आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक मशिदीतून या आठवड्यातील तसेच गेल्या आठवड्यातील शुक्रवारी दुपारच्या प्रार्थनेनंतर व इतर संस्थांच्या सहाय्याने हा निधी उभारला असल्याची माहिती संस्थेचे सचिव फैसल पठाण यांनी दिली.

हेही वाचा - महिला दिन विशेष: मराठी भाषेच्या उन्नतीसाठी बंगाली महिलेचा पुढाकार; काय केलं ते वाचा सविस्तर....

आम्ही राज्यात जमा करत असलेली मदत दंगलीत ग्रासलेल्या लोकांचे आणि कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी वापरला जाईल. याशिवाय, राज्यभरातील एसआयओ युनिटशी संबंधित डॉक्टर, वकील, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे एक पथक मदत कार्यात सामील होण्यासाठी दिल्लीला भेट देणार असल्याचेही सांगितले.

हेही वाचा - राममंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून १ कोटी रुपये; मुख्यमंत्र्यांची अयोध्येत घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.