मुंबई भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण राष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. त्याआधीच १३ ते १५ ऑगस्टपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या हर घर तिरंगा या अभियानास संबंध भारतातून उदंड प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे अनेक सोसायटी कार्यालये आणि घरांत राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक फडकवण्यात आला आहे तर ठिकठिकाणी कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे तसेच मुंबई पोलिसांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ किमी दौड हा कार्यक्रम आज सकाळी मारिन ड्राईव्ह येथील मुरली देवरा चौक येथे आयोजित केला होता या कार्यक्रमास प्रमुख पाहुणा म्हणून अभिनेता अक्षय कुमार याने हजेरी लावली होती जवळपास ४ हजारच्या आसपास लोकं या दौडमध्ये सामील झाले होते.
आमचा तिरंगा मान सन्मान वाढवत १५ तारखेला हर घर तिरंगा फडकवू या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतमाता की जय वंदे मातरमच्या घोषणा देऊन भाषणास सुरुवात केली व्यासपीठावर जमलेल्या आणि फिटनेससाठी प्रेरणा देणाऱ्या अक्षय कुमार यांना उल्लेख करत जमलेल्या तमाम जनतेसह पोलिसांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या फिल्म इंडस्ट्रीचे सुपरहिरो असा अक्षय कुमारचा उल्लेख करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो जवळजवळ ४ हजार लोकं सहभागी होत आहेत तसे तर आमचे पोलीस २४ बाय सेवन धावत असतात त्यांचं जीवन हे मॅरेथॉन सारखं असतं पण खरंतर ही मॅरेथॉन खऱ्या अर्थाने त्यांना आरोग्य आणि आनंद देणारी आहे विशेषतः अक्षय यांनी सांगितलं हर हाथ तिरंगा तिरंगा हा केवळ आपला झेंडा नाही तिरंगा आपला अभिमान स्वाभिमान आत्माभिमान आहे म्हणून या तिरंग्याकरिता आपण सर्व लोक याठिकाणी नतमस्तक असतो जेव्हा एखाद्या कॉमनवेल्थ गेममध्ये गोल्ड मेडल मिळतं तेव्हा आपला तिरंगा वर जातो आणि आपलं राष्ट्रगीत वाजतं तेव्हा आपला उर अभिमानाने भरून निघतो आमचे पोलीस असतील आमचे सैनिक असतील लढत असताना याच तिरंग्यापासून प्रेरणा घेतात आमच्या सीमेवर लढणारा सैनिक लढत असताना एकच विचार करतो जिंकलो तर तिरंगा लावेन आणि दुर्दैवाने शाहिद झालो तर तिरंग्यातून लपेटूनच माझा देह माझ्या घरी जाईल अशा प्रकारचा आमचा तिरंगा मान सन्मान वाढवत १५ तारखेला हर घर तिरंगा फडकवू असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
मी फडणवीसांचा आभारी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण मोठ्या दणक्यात साजरा करतोय याचा मला आनंद होतो आहे मुंबई पोलिसांनी आज मोठं आयोजन केलं आहे मी देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे कारण ते या कार्यक्रमास खास नागपूरहून आले आहेत उद्या त्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमासाठी पुन्हा नागपूरला जायचंय असं आपल्या भाषणातून म्हणाले तर अभिनेता अक्षय कुमार याने जमलेल्या लोकांना सकाळच्या शुभेच्छा दिल्या आणि यंदा हर घर तिरंगा आहे पुढल्या वर्षी हर हाथ तिरंगा असेल असे अक्षय कुमार याने जमलेल्या लोकांना संबोधित केले या कार्यक्रमास अभिनेता अक्षय कुमार मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते प्रवीण दरेकर, गृह विभागाचे मुख्य सचिव लिमये हे व्यासपीठावर उपस्थित होते