मुंबई - वाढत्या साखर सेवनाकडे जागतिक आरोग्य संघटनेने लक्ष वेधले आहे. यानंतर आता केंद्रीय अन्न मंत्रालयाने साखरेच्या पॅकिंगवर देखील दारू, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांवरील वेस्टनाप्रमाणेच ‘साखरेचे अतिरिक्त सेवन धोकादायक’ असा वैधानिक इशारा छापण्याचे बंधनकारक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
हेही वाचा... दिल्लीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक, येत्या दोन दिवसात पेच सुटण्याची शक्यता
भारतामध्ये साखर, मीठ आणि मैदा यांचे सेवन अधिक आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि स्थूलपणा निर्माण करण्यात हातभार लागतो. जगात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण भारतात आढळतात. देशात प्रतिवर्षी मृत्युमुखी पडणार्या रुग्णांच्या संख्येमध्ये सर्वाधिक रुग्ण हृदयरोग आणि मधुमेहाचे रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर स्वयंसेवी संस्थेमार्फत ‘राईट टू इट मिशन’ राबवले.
हेही वाचा... मॉब लिंचिंग रोखण्यासाठी राज्यांना विशेष सूचना, केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती
केंद्र शासनाच्या अन्न मंत्रालयाने आता ही चळवळ सरकारी बनवली आहे. या चळवळीअंतर्गत साखर पॅकिंगवर वैधानिक इशारा लिहिणे बंधनकारक केले जाणार आहे. भारतीय अन्न व औषध मानदे प्राधिकरण संस्थेने (FSSA)या संदर्भात शिफारसी केल्या आहेत. या संदर्भात अंमलबजावणी झाल्यास, साखर उद्योगाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. एकंदरीत गेली अनेक महिने साखर विक्री मंदावली आहे. तीन तीन महिने एकही ग्राम साखर विक्री होत नाही, तसेच साखरेची मागणी घडल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका साखर उद्योगाला बसत आहे, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड सांगितले आहे.
हेही वाचा... एकनाथ शिंदे बोलतात एक वागतात एक, ठाणे काँग्रेसचा आरोप
- उसाचा हंगाम 22 नोव्हेंबरला सुरू होणार
- यंदा 50 टक्के साखर उत्पादन घटणार
- गेल्या वेळी 107 लाख मेट्रिक टन गाळप झाले
- यंदा 57 लाख मेट्रिक टन साखर उत्पादित होणार
- राज्यात चौदाशे चारा छावणीलीला ऊस चाऱ्यासाठी गेल्याने ऊस कमी
- कमी उत्पादनाचा बाजाराला फरक पडणार नाही, कारण 70 लाख मेट्रिक टन साखर शिल्लक आहे
- राज्याला दरवर्षी 35 लाख मेट्रिक टन साखर लागते