मुंबई - ठाकुर्ली आणि कल्याणमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. सिग्नल यंत्रणा दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच रेल्वे सेवा सुरळीत होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल रेल्वे गाड्या अप आणि धिम्या मार्गावरील वाहतूक फास्ट डाउन मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. दोन्ही मार्गावर गाड्या एकामागोमाग एक उभ्या असल्याने मुंबईकरांनाही त्याचा फटका बसला. दरम्यान, सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरी असल्याची माहिती, रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.