ETV Bharat / city

योग्यवेळी निर्णय घेणार, समर्थकांची समजूत काढताना पंकजा मुंडेंचे सूचक वक्तव्य - ईटीव्ही भारत न्यूज

कोणताही निर्णय घेण्याची एक योग्य वेळ असते. उगाच कोणताही निर्णय घेऊन काय करायचे भावांनो असे म्हणतानाच आज पक्षाचे अलंकार माझ्याकडे नसतील मात्र माझं सौंदर्य तुम्ही आहात असे पंकजा म्हणाल्या. मी मांडलेला संसार मोडून मी जावे असं तुम्हाला वाटतं का. मला एकटीला न्याय नको, तुमच्या सर्वांसह मला न्याय हवा आहे असे पंकजा समर्थकांची समजूत काढताना म्हणाल्या.

कोणताही निर्णय घ्यायची एक योग्य वेळ असते, समर्थकांची समजूत काढताना पंकजा मुंडेंचे सूचक विधान

author img

By

Published : Jul 13, 2021, 1:57 PM IST

Updated : Jul 13, 2021, 3:09 PM IST

मुंबई : मला मंत्रिपदाची आणि खुर्चीची लालसा नाही असे स्पष्ट करतानाच जो चांगला असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत हे धर्मयुद्ध टाळण्याचा मी प्रयत्न करणार आहे असे सूचक विधान पंकजा मुंडे यांनी मुंबईत नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढताना केले. कोणताही निर्णय घ्यायची एक योग्य वेळ असते, आपलं घर आपण का सोडायचं असे बोलतानाच ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्या दिवशी बघू असेही त्या सूचकपणे म्हणाल्या.

कोणताही निर्णय घ्यायची एक योग्य वेळ असते

कोणताही निर्णय घेण्याची एक योग्य वेळ असते. उगाच कोणताही निर्णय घेऊन काय करायचे भावांनो असे म्हणतानाच आज पक्षाचे अलंकार माझ्याकडे नसतील मात्र माझं सौंदर्य तुम्ही आहात असे पंकजा म्हणाल्या. मी मांडलेला संसार मोडून मी जावे असं तुम्हाला वाटतं का. मला एकटीला न्याय नको, तुमच्या सर्वांसह मला न्याय हवा आहे असे पंकजा समर्थकांची समजूत काढताना म्हणाल्या. यावेळी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी समजावले. एकदा म्हणता महाराष्ट्राची वाघीण आली आणि एकदा म्हणता पंख छाटले, पंख आहे की पंजा ते ठरवा एकदा असे त्या म्हणाल्या.

धर्मयुद्धाचे सूचक उदाहरण

कार्यकर्त्यांची समजूत काढताना पंकजा मुंडेंनी महाभारतातील धर्मयुद्धाचे उदाहरण दिले. पांडवांनी धर्मयुद्ध जिंकलं कारण त्यांच्याकडे निती होती. पांडवांनी पाच गावं मागितली होती, तर सुईच्या टोकावर ठेवता येईल एवढीही जमीन देणार नाही असं कौरव म्हणाले. मात्र तेव्हाही त्यांनी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न केला होता. कारण जो चांगला असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचे प्रयत्न करतो. मीही जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत हे धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. मी कौरव आहे की पांडव आहे हे तुम्हाला माहिती आहे. मला धर्मयुद्ध टाळायचं आहे कारण माझे सैनिक धारातिर्थी पडावे असं मला वाटत नाही. त्यामुळे हे धर्मयुद्ध टाळण्यासाठी तुम्ही सर्व माझं ऐका असे त्या समर्थकांना म्हणाल्या.

काळ कधीही थांबत नाही

कौरवांच्या सेनेतील काही लोकही मनाने पांडवांसोबत होते आणि शरीराने कौरवांसोबत होते. कर्णाच्या रथाचा सारथीही त्याच्या विरोधात होता. अशी परिस्थिती येत असते. काळ कधीच थांबत नाही असे पंकजा मुंडे यावेळी बोलताना म्हणाल्या.

आपलं घर आपण का सोडायचं?

यावेळी बोलताना आपलं घर आपण का सोडायचं असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. आपण हे घर उभं केलं ते आपण का सोडायचं. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू असेही त्या सूचकपणे म्हणाल्या. मी कुणालाच भीत नाही, पण मी सर्वांचा आदर करते. माझे संस्कार निर्भय आणि संस्कारीत राजकारणाचे आहे. मी माझ्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा कधीही अनादर केला नाही असेही त्या म्हणाल्या.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर दबाव आणून काय मिळवणार

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर दबाव आणून मी काय मिळवणार आहे? आज मी केंद्रीय मंत्री नसले तरी राष्ट्रीय मंत्री आहे ना. प्रवास खडतर होता आणि पुढेही खडतर दिसत आहे, मी निवडणुकीत हरले असले तरी संपले नाही. आपल्यात फुट पाडण्याचा डाव आखला जात आहे असे त्या म्हणाल्या.

मोदी, शाह हे माझे नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा हे माझे नेते आहेत. त्यांच्या मनात काहीतरी चांगलं आहे असा मला विश्वास आहे. मी कुणालाही भीत नाही, पाहु काय होतं. नाहीतर कोयता घेऊन ऊसात जाऊ असेही त्या म्हणाल्या. केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्यावरच त्यांचा निर्णय सोपवावा आणि माझ्या प्रवासाला स्वल्पविराम द्यावा. तुमच्या राजीनाम्यावर मी स्वार नाही, मला दबावतंत्र जमत नाही कारण स्वाभीमान हा गोपीनाथ मुंडेंचा बाणा होता असे पंकजा म्हणाल्या. संधी मिळाली असती तर मी शपथविधीलाही गेले असते, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, ते माझ्यावर सोडा

इथुन पुढे असा प्रयोग कृपया करू नका असे पंकजा समर्थकांना म्हणाल्या.

मोदींसोबत सन्मानजनक बैठक झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अत्यंत सकारात्मक आणि सन्मानजनक बैठक झाली. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबतही सकारात्मक चर्चा झाली. राज्यातील कार्यकर्ते नाराज आहेत हे मी त्यांना सांगितले. त्यावर तुम्ही कार्यकर्त्यांची समजूत घालणार याचा आम्हाला विश्वास आहे असे जे पी नड्डा म्हणाले. माझ्या देशाचे पंतप्रधान आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी कधीही माझा अपमान केला नाही असे त्या यावेळी म्हणाल्या.

समर्थकांची काढली समजूत

मी तुमच्यापेक्षा छोटी आहे, पण तुमच्या पालकाच्या भूमिकेत आहे. मी तुमच्या अलंकाराने सजली आहे. तुमचं सगळं दुख माझ्या ओटीत टाका आणि माझ्या चेहऱ्यावरचं हसू तुमच्या घरी घेऊन जा असे म्हणत त्यांनी कार्यकत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मी काय मागितलं आणि मला काय नाही मिळालं एवढ्या चिल्लर लढाईत मी जात नाही. आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठी इथं उपस्थित आहोत असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा - Pankaja Munde : ...अन् वडिलांच्या आठवणीने पंकजा मुंडे गहिवरल्या

Last Updated : Jul 13, 2021, 3:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.