मुंबई - देशामध्ये कोरोनाने थैमान घातला आहे. नागरिक कोरोना विरोधातील लढाई लढत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. मुंबईमध्ये कोहिनूर सार्वजनिक वाहनतळ येथे ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन सुरू आहे. आज या लसीकरण केंद्रावर 98 आणि 99 वर्षाच्या एका आजीला आणि आजोबांना लस देण्यात आली.
लसीकरण मोहिमेअंतर्गत कोहिनूर सार्वजनिक वाहनतळ येथे 99 वर्षाच्या रतन मीर यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. तसेच नलिनी माने या 98 वर्षांच्या आजींना देखील कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. सरकार कोरोनाला अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजन आखत आहेत. यामध्ये लसीकरण हा महत्वपूर्ण उपाय आहे. त्यामुळे राज्य सरकारने लसीकरण मोहीम हातात घेतली आहे. त्यामाध्यामातून राज्यभरात लसीकरण सुरू आहे. पहिल्या टप्प्यात 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तर 1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येत आहेत. मुंबईमध्ये देखील लसीकरण मोहिमेने जोर धरला आहे.
केंद्रावर मातृदिन साजरा -
आज जागतिक मातृदिन आहे. कोहिनूरच्या ड्रायव्हिंग नॅशनल सेंटर मध्ये जागतिक मातृदिन साजरा करण्यात आला.