ETV Bharat / city

मलबार हिल, ब्रीचकँडी परिसरात कोरोनाचा धोका वाढला, सोसायट्यांना खबरदारी घेण्याचे निर्देश - मलबार हिल कोरोना अपडेट

उच्चभ्रू वस्तीमध्ये कोरोना फैलावत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक पालिका प्रशासनाकडून बोलावण्यात आली. यावेळी 160 सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त गायकवाड यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घेण्यात येणाऱया खबरदारीबाबत प्रतिनिधींना निर्देश दिले.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Jun 29, 2020, 10:38 AM IST

मुंबई - जगभरात थैमान घालणारा कोरोना विषाणूचे रुग्ण शहरातील उच्चभ्रू सोसायट्य़ांमध्ये आढळले आहेत. त्यामुळे रोज कामगारांचे स्क्रिनिंग करणे, सामाजिक अंतर, आवश्यक खबरदारी , कामगारांसाठी असलेल्या टॉयलेटचे दिवसांतून तीन वेळा निर्जंतुकीकरण करणे, असे निर्देश सोसायट्यांना दिल्याचे डी वॉर्डचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.

उच्चभ्रू वस्तीमध्ये कोरोना फैलावत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक पालिका प्रशासनाकडून बोलावण्यात आली. यावेळी 160 सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त गायकवाड यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घेण्यात येणाऱया खबरदारीबाबत प्रतिनिधींना निर्देश दिले.

पालिकेच्या ‘डी’ वॉर्डमध्ये नियंत्रणात असलेला कोरोना गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. यामध्ये चार दिवसांपूर्वी दररोज 30 ते 35 ने होणारी रुग्णवाढ आता मात्र सरासरी 50 झाली आहे. विशेष म्हणजे, ही वाढ मलबार हिल, नेपियन्सी रोड, पेडर रोड, ब्रीचकँडी अशा उच्चभ्रू वस्त्यांमध्ये होत आहे. त्यामुळे पालिकेसमोर ‘डी’ वॉर्ड म्हणजेच ग्रँट रोड परिसरात कोरोना रोखण्याचे आव्हान वाढले आहे.

डी विभागात आतार्यंत एकूण 2 हजार 259 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यातील 1 हजार 574 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे फक्त 685 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. मात्र, सुरुवातीपासून नियंत्रणात असलेल्या ग्रँट रोड परिसरात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रुग्णवाढ झाल्याचे समोर आले आहे. जूनपासून 20 दिवसांत 500 हून जास्त केसेस वाढल्या आहेत. यामध्ये उच्चभ्रू वस्तीमध्ये काम करणार्‍या ड्रायव्हर, हाऊसकिपिंग कामगार, सिक्युरिटी गार्ड यांची संख्या 170 आहे. धारावी, मानखुर्दसह परराज्यातून आलेले काही कामगार यात समाविष्ट असल्याचे ते म्हणाले.

प्रवास करून येताना या कामगारांना लागण होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ग्रँट रोडमध्ये कोरोना रोखण्यासाठी 11 कंटेनमेंट झोन असून 184 इमारती आणि इमारतींचे भाग सील करण्यात आले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

ग्रँट रोड परिसरात लक्षणे नसलेल्या संशयितांसाठी 20 ‘कोरोना केअर सेंटर -1’ सुरू करण्यात आली असून याची क्षमता एक हजार बेडची आहे. यामध्ये सध्या फक्त 400 रुग्ण असून 600 बेड रिक्त आहेत. आवश्यकतेनुसार काहीजण होम क्वारंटाइनही आहेत. लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन बेड असलेले दोन सुसज्ज क्वारंटाइन सेंटर असून या ठिकाणी बेड क्षमता 100 आहे. यात 50 टक्के बेड रिक्त आहेत. त्यामुळे ‘डी’ वॉर्डमध्ये बेडची कमतरता नसल्याचे गायकवाड यांनी सांगितले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.