मुंबई : गेले काही दिवस शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेत जागतिक स्तरावरच्या होणाऱ्या घडामोडी, रशिया आणि युक्रेन मधील तणाव, कच्च्या तेलाचे वाढते भाव, विदेशी गुंतवणूकदारांना सातत्याने होणारी विक्री, रुपयाची सातत्याने होणारी घसरण, आणि तिमाही निकालावरील पोरेटिंग मार्जिनचा दबाव हे आहेत.
लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, आणि सिक्युरिटी ट्रांजेक्शन टॅक्स या दोन पैकी एक टॅक्स रद्द करण्यात यावा अशी अपेक्षा शेअर बाजाराची आहे. तसा निर्णय झाल्यास बाजारात मोठ्या प्रमाणात उसळी येऊ शकते. तर उद्योग क्षेत्राचे लक्ष डिव्हीडंट एक्स किंवा बाय-बॅक टॅक्स यामध्ये कपात होईल का? याकडे लक्ष आहे. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या लघुउद्योगांना इम्पोर्ट ड्युटी कमी होणे किंवा काही दरात कमी होईल का? या कडे लक्ष असणार आहे. तसेच उद्योग जगातील इतर क्षेत्र या बजेटमधून आपल्याला काही दिलासा मिळेल का? या कडे लक्ष ठेवुन आहे. तसेच कर मर्यादा वाढवावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.