ETV Bharat / city

Chandrakant Patil On Nawab Malik : मलिकांची खाती काढून राज्य सरकारने संवेदनशीलता दाखवावी - चंद्रकांत पाटील - नवाब मलिक न्यायालयीन कोठडीत

दाऊद इब्राहिम मनी लॉन्डरिंग ( Daud Ibrahim Money Laundering Case ) प्रकरणात राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक हे न्यायालयीन कोठडीत ( Nawab Malik In MCR ) आहेत. भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मलिक यांची सर्व खाती काढून घेत राज्य सरकारने संवेदनशीलता दाखवावी, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ( Chandrakant Patil On Nawab Malik ) दिली.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Mar 15, 2022, 3:05 PM IST

मुंबई - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ( Daud Ibrahim Money Laundering Case ) नवाब मलिक न्यायालयीन कोठडीत ( Nawab Malik In MCR ) आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील सर्व खाते काढून राज्य सरकारने संवेदनशीलता दाखवावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधान भवनात ( Chandrakant Patil On Nawab Malik ) केली. हिजाबबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.

राजीनामा घ्यायला सरकार तयार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिकांवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई सुरू आहे. मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. भाजपकडून मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विधानभवनात लावून धरली आहे. सकाळच्या सत्रात राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपकडून सातत्याने विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले जाते. आजही पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी यावेळी संवाद साधला. भाजपकडून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू या काळात मलिक यांचा राजीनामा घ्यावा अशी करतो आहोत. सरकार राजीनामा घ्यायला तयार नाही. सरकारने काहीतरी संवेदनशीलता दाखवून खाती काढून घ्यावी, अशी मागणी पाटील करावे.

भाजप नेते टार्गेटवर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्टिंग ऑपरेशन करून सरकारमधील अनेक नेत्यांना लक्ष्य केले. त्यानंतर राज्य सरकारकडून भाजप नेत्यांना अडकवण्यात येत आहे. आज केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि प्रवीण दरेकर यांची नावे समोर आली आहेत. आमचे सरकारला आव्हान आहे, तुम्ही कितीही केसेस दाखल करा, आम्ही घाबरणार नाही. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. त्यांच्याकडून न्याय मिळवून घेऊ, असे पाटील म्हणाले.

प्रवीण चव्हाण मोहरा

शासकीय वकील प्रवीण चव्हाण याने भाजप नेत्यांना गुन्ह्यात अडकवण्यासाठी काम केले आहे. आता त्यांना काढून टाकले आहे. मात्र त्यांनी केलेल्या कामाचा वापर महाविकास आघाडी सरकारला करता येणार आहे, असे पाटील म्हणाले.

हिजाब निर्णयाच स्वागत

कर्नाटक न्यायालयाने शाळांमध्ये हिजाब पेहरावला बंदी असल्याचे निर्वाळा दिला. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आहे. आम्ही कोणाच्या धर्मात ढवळाढवळ करत नाही. परंतु कोणीही कोणावर सक्ती करू नये. शाळा आणि महाविद्यालयाचे काही नियम असतात ते पाळायला हवेत, असे पाटील यांनी सांगितले.

फडणवीस स्वतः खुलासा करतील

देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर लांबे यांच्यासंदर्भातील व्हिडीओ क्लिप काल सभागृहात सादर केली. सरकारने अशा लोकांना निवडण्याचा आरोप केला होता. मात्र दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि डॉक्टर तांबे यांचे व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाले. चंद्रकांत पाटील यावर सावध भूमिका मांडली. देवेंद्र फडणीस हे मासलीडर आहेत. अनेक लोक त्यांना भेटत असतात. मात्र यासंदर्भात स्वतः फडणवीस आज खुलासा करतील, असे सांगत काढता पाय घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.