मुंबई - कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे, अशा काळामध्ये सरकारकडून नागरिकांच्या हिताची काळजी घेतली जात आहे. या काळामध्ये मंदिर उघडावे की नाही, अशा परिस्थितीत नेमके काय करावे ही सर्व जबाबदारी सरकारची आहे. परंतु राज्यपालांनी या काळात मंदिर उघडण्यासंदर्भात सूचना करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
मंदिर उघडण्यासंदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या सूचनेचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. कोरोनाचे संकट राज्यात कायम असताना राज्यपालांनी मदिंर उघड्याबाबत केलेल्या अग्राहावर आता सर्व स्थरातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील राज्यपालांवर निशाना साधला आहे. महाराष्ट्र सरकारची जबाबदारी हे राज्याचा व्यवहार कसा करायचा ती आहे. त्यामुळे सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहे. त्यातच राज्यपालाकडून मंदिर उघडण्या संदर्भात सूचना येणे हे योग्य नसल्याचे मत पटेल यांनी व्यक्त केले. सरकार चालवणे, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, ही महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे. त्यातच मंदिर उघडावे की नाही आणि अनलॉक काळामध्ये काय करावे ही सर्व जबाबदारी सरकार पार पाडत आहे. म्हणून मी राज्यपालांना विनंती करतो की, त्यांनी अशा प्रकारच्या सूचना टाळाव्यात असेही पटेल यांनी म्हटलं आहे
दरम्यान, पटेल यांनी भारतीय संविधानाची शपथ घेताना प्रत्येक लोकप्रतिनिधी हा सेक्युलर या शब्दाची शपथ घेत असतो त्यामुळे भारत हा देश सर्व धर्म परंपरा यांचे जतन करणार आहे त्यामुळे ज्यांना संविधानाची तत्व आणि संविधान मान्य नाही त्यांनी या देशात राहण्याची गरज नाही, त्यामुळे अशा वादात काहींनी पडू नये असा टोलाही भाजपचे नाव न घेता प्रफुल पटेल यांनी यावेळी लगावला.