ETV Bharat / city

अग्निशामक दलाला महापालिका रुग्णालयावर नाही भरोसा, खासगीला कंत्राट - अग्निशामक दल मुंबई

अग्निशामक दला(fire brigade) तील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तापसणीसाठी वयोमर्यादा ४५ वर्षे होती. दुसऱ्यांदा कंत्राट देताना ही वयोमर्यादा कमी करून ४० करण्यात आली. तिसऱ्यांदा कंत्राट देताना ही वयोमर्यादा ३५ करण्यात आली. कार्मचाऱ्यांची वयोमर्यादा कमी करून कंत्राटदाराला जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून करण्यात आल्याचे या प्रस्तावातून समोर आले आहे.

शहीद गोवारी स्मृती दिवस
शहीद गोवारी स्मृती दिवस
author img

By

Published : Nov 23, 2021, 3:48 PM IST

Updated : Nov 23, 2021, 5:25 PM IST

मुंबई - अग्निशामक दल (fire brigade) मुंबई महापालिके(BMC)च्या अखत्यारीत येते. या दलातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी पालिका रुग्णालयात मोफत सुविधा असतानाही अपोलो क्लिनिक (Apollo Clinic) या खासगी रुग्णालयाकडून केली जात आहे. त्यासाठी प्रति कर्मचारी तपासणीसाठी ३, ६००-३, ९०० रुपये याप्रमाणे ३ वर्षांसाठी २.२२ कोटींचे कंत्राट दिले जाणार आहे. या खासगी रुग्णालयाला या आधी पाच वर्षांचे कंत्राट देण्यात आले होते, आता पुन्हा तीन वर्षांचे कंत्राट दिले जाणार आहे. यामुळे अग्निशामक दलाला पालिका रुग्णालयावर भरोसा नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खासगी रुग्णालयाकडून तपासणी

मुंबई महानगरपालिकेकडून अग्निशामक सेवा पुरवली जाते. त्यासाठी अग्निशामक दलाची स्थापना करण्यात आली आहे. अग्निशामक दल पालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने या दलाच्या कर्मचाऱ्यांवर पालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. तसेच उपचार करताना पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे प्राधान्य दिले जाते. असे असताना अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांची खासगी रुगणलायकडून तपासणी केली जात आहे. त्यासाठी २०१६-१७ या वर्षासाठी मे. अपोलो क्लिनिक' या कंत्राटदाराला ४० वर्षे पूर्ण असलेल्या प्रति कर्मचारी ३ हजार रुपये या दराने कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा २०१८ ते २०२० या ३ वर्षांसाठी सुद्धा टेंडर प्रक्रियेत याच कंत्राटदाराला प्रति कर्मचारी ३, ९०० रुपये या दराने काम देण्यात आले. त्यावेळी कंत्राटदाराला प्रति वर्षी ६६ लाख ३० हजार रुपये प्रमाणे ३ वर्षांत १कोटी ९८ लाख ९० हजार रुपये अदा केले.

पुन्हा ३ वर्षांसाठी २.२२ कोटींचे कंत्राट

आता पुन्हा टेंडर प्रक्रियेत पुन्हा याच कंत्राटदाराला काम देण्यात येत आहे. अग्निशामक दलातील ज्यांचे वय ३५ वर्षे पूर्ण झाले आहे, अशा २ हजार अधिकारी, कर्मचारी ज्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. या वैद्यकीय तपासणीसाठी प्रत्येकी ३, ६०० ते ३, ९०० रुपये याप्रमाणे सन २०२१ ते २०२३ या ३ वर्षांसाठी २ कोटी २२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये वैद्यकीय तपासणी, चहापान यांचा खर्च समाविष्ट आहे. २०२१ व २०२२ या २ वर्षांसाठी प्रत्येकी ३, ६०० रुपये तर २०२३ या वर्षांसाठी ३, ९०० रुपये दर ठरविण्यात आले आहे.

वयोमर्यादा घटवली

अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तापसणीसाठी वयोमर्यादा ४५ वर्षे होती. दुसऱ्यांदा कंत्राट देताना ही वयोमर्यादा कमी करून ४० करण्यात आली. तिसऱ्यांदा कंत्राट देताना ही वयोमर्यादा ३५ करण्यात आली. कार्मचाऱ्यांची वयोमर्यादा कमी करून कंत्राटदाराला जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून करण्यात आल्याचे या प्रस्तावातून समोर आले आहे.

Last Updated : Nov 23, 2021, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.