ETV Bharat / city

प्रतीक्षा संपली.. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ATKT परीक्षा झाल्या सुरू - Mumbai University examination

मुंबई विद्यापीठाच्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम वर्ष, सत्राच्या एटीकेटी (बॅकलॉग)च्या परीक्षा आजपासून सुरु झाल्या आहेत.७२ हजार ५०० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

final year ATKT examinations
मुंबई विद्यापीठा
author img

By

Published : Sep 25, 2020, 10:33 PM IST

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील विद्यापीठांनी आपल्याकडील अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि त्याची तयारी सुरू केली असतानाच आज मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष, सत्राच्या एटीकेटी (बॅकलॉग)च्या परीक्षा आजपासून सुरु झाल्या आहेत.

यात विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, विद्यापीठ शैक्षणिक विभाग आणि दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील परीक्षांचा समावेश आहे. मुंबईत विद्यापीठातून तब्बल ७२ हजार ५०० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. विद्यापीठाच्या कालिना, ठाणे रत्नागिरी संकुलासह, विद्यापीठाशी संलग्न असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.

कला, वाणिज्य, विज्ञान आदी चार विद्याशाखेअंतर्गत विविध अभ्यासक्रम आणि विषयांच्या बॅकलॉगच्या परीक्षा आज सुरळीत पार पडल्या. अत्यंत सुलभ अशा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यापीठाने आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात परीक्षा घेतल्या. परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना नमूना प्रश्न पत्र व त्यांच्या सराव परीक्षाही घेण्यात आल्या होत्या. काही विषयांच्या सराव परीक्षा अजूनही घेतल्या जाणार आहेत. काही अपरिहार्य किंवा तांत्रिक कारणास्तव एखादा विद्यार्थी परीक्षेला बसू शकला नसेल अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

एटीकेटी आणि नियमित परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाने विद्याशाखानिहाय महाविद्यालयांचे ९४ समूह निर्माण केले आहेत. समूह महाविद्यालयांनी त्यांच्या वेळापत्रकानुसार आजच्या बॅकलॉगच्या परीक्षांचे यशस्वी आयोजन करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.