ETV Bharat / city

दुकाने, आस्थापनावरील मराठी पाट्या लावण्याची मुदत आज संपणार - marathi signboards on shops

दुकाने, आस्थापना, शासकीय-निमशासकीय कार्यालयांवर ठळक अक्षरात मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत संपणार आहे. मात्र मराठी पाट्या लावण्यात आले नसल्याचे चित्र आहे. राज्य सरकार अशांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे. प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे.

http://10.10.50.85//maharashtra/31-May-2022/mh-mum-marathi-patya-7209781_31052022095637_3105f_1653971197_691.jpg

author img

By

Published : May 31, 2022, 10:29 AM IST

मुंबई - राज्यातील दुकाने, आस्थापने, शासकीय-निमशासकीय कार्यालयांवर ठळक अक्षरात मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत संपणार आहे. मात्र मराठी पाट्या लावण्यात आले नसल्याचे चित्र आहे. राज्य सरकार अशांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे. प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे.

पाट्या ठळक मराठी भाषेत लावण्याची सक्ती - मराठीला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातील दुकाने आणि आस्थापनावरील पाट्या मोठ्या शब्दांत आणि ठळक मराठी भाषेत लावण्याची सक्ती करण्यात आली होती. राज्य शासनाने तसे आवाहन केले. मोठ्या प्रमाणात जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आली. ३१ मे पर्यंत दुकानं, अस्थापना, शासकीय निमशासकीय कार्यालयांना मराठी पाट्या लावण्यासाठी मुदत देण्यात आली. आज मुदतीचा शेवटचा दिवस असणार आहे. दरम्यान, नियमांचे पालन न केल्यास दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिला होता.

कारवाईचा मार्ग मोकळा - सर्वच मराठी पाट्या लावणे बंधनकारक केले. सध्या शाळांमध्ये मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. पूर्वी दहापेक्षा कमी कर्मचारी असणाऱ्या आस्थापनेच्या दुकानाला मराठी पाट्या लावण्याची कायद्यात अट नव्हती. या पळवाटेचा वापर करून मराठी पाट्याचा वापर होत नव्हता. आता याला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने राजभाषा विधेयक मंजूर केले आहे. सर्वच कार्यालय, छोटी- मोठी दुकाने, आस्थापनांवर मराठी पाट्यांच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

गडकिल्यांची, महापुरुषांची नावे नकोत - मराठी पाट्या लावताना मद्य किंवा मद्यपान सेवा असलेली दुकाने, बार, रेस्टॉरंटला महापुरुष किंवा आदरणीय महिला, गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत अशा सूचना आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.