मुंबई - क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावर आज (गुरुवार) सुनावणी झाली. आर्यनची बाजू प्रसिद्ध वकील सतिश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनी मांडली. एनसीबीच्या वकिलांनी जामिनाला विरोध करत सर्वोच्च न्यायालयाचे अनेक दाखले दिले. या दरम्यान, या वकिलांमध्ये प्रखर युक्तिवाद दिसून आला. काल जामिनावर सुनावणी सुरू असताना हिच परिस्थिती होती. आजही तेच चित्र दिसून आले. त्यानंतर सत्र न्यायालयाने हा निकाल २० ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला. त्यामुळे, आर्यनचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे. आज त्याला जामीन मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती, पण निर्णय राखून ठेवल्याने त्याला लगेच दिलासा मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे.
हेही वाचा - College reopen : राज्यात २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू, उदय सामंत यांची घोषणा
आर्यन खानचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम आणखी ५ दिवसांनी वाढला आहे. न्यायालयाने यावरील निर्णय २० ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला आहे. आता या प्रकरणी २० ऑक्टोबर रोजी निर्णय होणार आहे.
व्ही.व्ही.पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी
आर्यन खानच्या जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. आर्यन खानसाठी आजचा दिवस आणि आजची सुनावणी महत्त्वाची होती. कारण, मुंबई उच्च न्यायालयाला 15 ते 19 ऑक्टोबर दरम्यान सुट्टी आहे. आज आर्यन खानला जामीन मिळाला नाहीत तर, 19 ऑक्टोबरपर्यंत त्याला कारागृहात मुक्कामी राहावे लागणार होते.
न्यायालयात कोण काय म्हणाले?
आर्यन खानच्या जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान, एनसीबीने न्यायालयाला सांगितले की, त्यांच्याकडे असे पुरावे आहेत जे दर्शवतात की, आर्यन अनेक वर्षांपासून ड्रग्सचे सेवन करत आहे. एवढेच नाही तर, त्याने इतर देशांमध्ये ड्रग्सचे सेवन देखील केले आहेत.
- एनडीपीएस कायद्या अंतर्गत कलम 37 च्या लागू करण्याबाबत आणि गुन्ह्याच्या गांभीर्याबाबत दुसरा निर्णय दिला आहे.
- कलम 37 च्या आदेशानुसार, जामीन मंजूर करताना न्यायालयाने आरोपीने असाच गुन्हा करण्याची शक्यता आहे की नाही, हे न्यायालयाने पाहिले पाहिजे.
एएसजी कोर्टात म्हणाले...
आर्यन खान ड्रग प्रकरणात, एएसजी कोर्टात म्हणाले, देशात आणि परदेशातील ड्रग्समुळे समाज आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खूप मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे, आम्ही ही बाब गंभीरपणे घेत आहोत. तरुणांना या व्यसनातून मुक्त करण्यासाठी आणि या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एनसीबीचे अधिकारी दिवस - रात्र काम करत आहेत. आर्यन खान अशा लोकांच्या संपर्कात आहेत जे आंतरराष्ट्रीय ड्रग्स नेटवर्कचा भाग आहेत. सद्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जर आर्यन खानला जामीन मिळाला तर तो देश सोडून जाण्याची शक्यता आहे.
- एनसीबीने आर्यनच्या जामिनाला विरोध केला.
आर्यन खानचे वकील अॅड. अमित देसाई म्हणाले..
अॅड. अमित देसाई म्हणाले, मला असे वाटत नाही की, संपूर्ण जग ड्रग्सच्या संकटाशी लढत आहे. यावर वाद होऊ शकतो. आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळाले आणि आम्ही त्याचे संरक्षण केले पाहिजे आणि तरुण पिढीला अमली पदार्थांच्या संकटापासून वाचवायला हवे. परंतु, आपण हे विसरू नये की, आम्ही संविधानासाठी लढलो आणि आम्ही कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेसाठी लढलो. या कायद्यानुसार सर्वकाही घडले पाहिजे. आर्यन खानला कायदेशीर जामीन मिळावा. त्याला त्याचा अधिकार सविधानाने दिला आहे. सुरू असलेल्या एनसीबीच्या तपासावर परिणाम न करता, आर्यनचा जामीन मंजूर केला जाऊ शकतो. जामीन त्यांचा तपास सुरू ठेवण्याचा अधिकार काढून घेत नाही. आर्यनचे वकील अमित देसाई म्हणाले, एएसजीने सांगितले की, आर्यनने त्याचा फोन त्याच्या स्वत: च्या इच्छेनुसार दिला. पण, मी म्हणतो आर्यनचा फोन जप्त करण्यात आला, पण पंचनाम्यामध्ये उल्लेख नाही.
कालही झाली होती सुनावणी
काल (बुधवार) सुमारे ५ तासांपेक्षा जास्त काळ ही सुनावणी सत्र न्यायालयात सुरू होती. एनसीबीकडून आर्यन खानच्या जामीनाला जोरदार विरोध करण्यात आला. अॅड. अमित देसाई यांनी आर्यनची बाजू मांडली होती. यात सुनावणी बरीच लांबली. त्यामुळे, आर्यन खानच्या जामिनावरील निर्णय आज (गुरुवार) होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती आणि आज न्यायालयाने आर्यन खानला जामीन नकारला.
हेही वाचा - Drugs cruise case: आर्यन खानच्या आजचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगातच, जामिनावर उद्या सुनावणी