ठाणे - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ठाणे पोलीस आयुक्तांनी एसआयटीची (SIT) स्थापना केली. डीसीपी दर्जाचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करणार आहेत. परमबीर सिंग आपले म्हणणे मांडण्यासाठी ठाणे पोलीस ठाण्यात (Param Bir Singh landed in Mumbai) दाखल झाले आहेत.
मुंबईतील व्यावसायिक केतन तन्ना, सोनु जलान आणि रियाज भाटी या तिघांनी 30 जुलै रोजी परमबीर सिंग यांच्यासह 29 जणांविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणी आणि खोट्या गुन्ह्यात अडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ठाणे न्यायालयाने परमबीर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले होते. ठाणे पोलीस परमबीर यांच्या मुंबई आणि चंदीगड येथील घरी जाऊन आले होते. मात्र, ते घरी नसल्याने त्यांच्या घरावर ठाणे पोलिसांनी वॉरंटची प्रत लावली होती.
ठाण्यात परमबीर सिंगचे आदरातिथ्य
परमबीर सिंग ठाणे नगर पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर पोलीस स्टेशन बाहेरील प्रसिद्ध हॉटेलमधून 3 ग्रीन टी आणि 3 नॉर्मल चहा पोलीस स्टेशन मागवण्यात आल्या होत्या. परमबीर सिंग यांनी ग्रीन टी घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
चौकशीसाठी हजर...
100 कोटी वसूली प्रकरणात चौकशीसाठी समन्स पाठवल्यानंतरही हजर न झाल्यामुळे मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police ) सिंह यांना फरार म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर किला कोर्टाने सिंह यांना फरार घोषित केले ( Declared Absconding ) होते. तसेच आगामी 30 दिवसांच्या आत हजर न झाल्यास संपत्ती जप्ती करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी तंबीदेखील कोर्टाने दिली होती. त्यानंतर आता सिंह मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाले.
फरार घोषीत आदेश रद्द करावा -
अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते अखेर मुंबईत (Param Bir Singh landed in Mumbai)परतले आहेत. आज त्यांनी आपल्याविरोधातील फरार आदेश रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. परमबीर सिंग यांनी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस.बी.भाजीपाले ( Additional Chief Metropolitan Magistrate SB Bhajipale ) यांच्यासमोर अधिवक्ता गुंजन मंगला यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे.