ETV Bharat / city

Discuss on symbol : ठाकरे व शिंदे गटाकडून राजकीय हालचाली वाढल्या, चिन्हाबाबत आज दिवसभर बैठकांचे सत्र - ठाकरे आणि शिंदे गट

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय शनिवारी रात्री घेतला. तसेच दोघांनाही नाव वापरण्यास मनाई करत सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर तर शिंदे गटाची वर्षा निवासस्थानी बैठक होणार ( Thackeray and Shinde group will hold a meeting session today to discuss on symbol) आहे. या बैठकांमध्ये दोन्हींकडून वेगवेगळ्या चिन्ह आणि पक्षाबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Discuss on symbol
निवडणूक आयोगाच्या निर्णानंतर ठाकरे व शिंदे गटाकडून राजकीय हालचाली वाढल्या असून, चिन्हावर चर्चेसाठी आज दिवसभर बैठकांचे सत्र सुरू असणार आहे.
author img

By

Published : Oct 9, 2022, 12:48 PM IST

मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय शनिवारी रात्री घेतला. तसेच दोघांनाही नाव वापरण्यास मनाई करत सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर तर शिंदे गटाची वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे. ( Thackeray and Shinde group will hold a meeting session today to discuss on symbol ) या बैठकांमध्ये दोन्हींकडून वेगवेगळ्या चिन्ह आणि पक्षाबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

दोन्हीकडून राजकीय हालचाली वाढल्या - शिवसेना कोणाची हा वाद न्याय प्रविष्ट असल्याने शिवसेनेचे चिन्ह गोठवावे,, अशी मागणी शिंदे गटाकडून न्यायालयात करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने त्यानुसार शनिवारी चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला. शिवसेनेच्या वादातील अर्धी लढाई जिंकल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. मात्र, निवडणूक आयोगाने सोमवारी (१० ऑक्टोबर), दुपारी १ वाजता पर्यायी तीन चिन्हाच्या पर्याय देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्हीकडून राजकीय हालचाली वाढल्या असून पर्यायी चिन्हासह नावाबाबत विचारविनिमय ( Discuss on symbol ) सुरू आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांची मातोश्री तर शिंदे गटाची वर्षा निवासस्थानी बैठका होणार आहेत.

उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाणार - उद्धव ठाकरे यांची दुपारी १२ वाजता मातोश्री निवासस्थानी बैठक होणार आहे. बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर शिंदे गटाकडून ही सायंकाळी सात वाजता बैठक बोलावली असून रणनीती आखली जात आहे. त्यामुळे ठाकरे विरोधात शिंदे असा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.