ETV Bharat / city

एसटीचे वरातीमागून घोडे; एका वर्षानंतर सॅनिटायझेशनसाठी निविदा

author img

By

Published : Apr 8, 2021, 7:25 PM IST

एका वर्षानंतर सॅनिटायझेशनसाठी निविदा काढल्या आहेत. बसेस सतत सॅनिटाईझ कराव्या लागत असल्याने आम्ही आता या कामासाठी निविदा काढली आहे, असे महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी सांगितले.

Tenders issued by ST corporations for sanitation after one year
एसटीचे वरातीमागून घोडे ; एका वर्षानंतर सॅनिटायझेशनसाठी निविदा

मुंबई - गेल्या वर्षभरापासून मुंबईसह महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेल्या कोरोनामुळे राज्यात दुसर्‍यांदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल वर्षभरानंतर एसटीच्या गाड्या सॅनिटाईझ करण्यासाठी एसटी महामंडळाने निविदा काढल्या आहेत. त्यामुळे वरातीमागून घोडे नाचवणाऱ्या एसटी महामंडळात यापूर्वी नियमितपणे बसेस कोण सॅनिटाईझ करत होते? आत्ताच निविदा काढण्याची काय गरज भासली? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

एसटीचे वरातीमागून घोडे; एका वर्षानंतर सॅनिटायझेशनसाठी निविदा

प्रवाशांचे आरोग्य धोक्यात-

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांमध्ये 30 एप्रिल पर्यंत पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. या मिनी लॉकडाऊन काळात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कोविड नियमाची अट घालून सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र, एसटीच्या बसेस नियमितपणे सॅनिटाईझ होत नाहीत. इतकंच नव्हे तर गेल्या एका वर्षानंतर बसेस सॅनिटाईझ करण्यासाठी आता महामंडळाने निविदा काढली आहे. ही निविदा प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कार्यपध्दती प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून एसटी कर्मचाऱ्याचे आणि प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

653 एसटी कर्मचाऱ्यांना उपचार सुरू-

कोरोना महामारी आतापर्यंत राज्यभरातील 5 हजार 401 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 123 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनाबांधीत 653 कर्मचाऱ्यांना विविध रुगणालात उपचार सुरू आहेत. यावरुन अंदाज येतो की, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची आरोग्य धोक्यात आहेत. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले की, पूर्वी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सॅनिटाईझर आणि मास्क महामंडळाकडून दिले जात होते. मात्र, आता ते सुद्धा एसटी महमंडळाकडून बंद करण्यात आले आहेत. आम्ही कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी अनेकदा मागणी केली आहे. मात्र, आमच्या मागणीकडे आतापर्यंत एसटी महामंडळाने दुर्लक्ष केले आहे.

दररोज 13 कोटी रुपयांचे नुकसान -

एसटी महामंडळ 18 हजाराहून अधिक बस, राज्यात 250 आगारे, 609 बस स्थानके आणि लाखभर कर्मचारी असा मोठा गाडा सांभाळणारी एसटी आशियातील सर्वात मोठी सार्वजनिक परिवहन सेवा मानली जाते. मात्र, कोरोनामुळे एसटी महमंडळाला दररोज 13 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. कोरोनापूर्वी राज्यभरात एसटी महामंडळाचा दररोज 16 हजार बसेस धावत असून 65 लाख प्रवासी प्रवास करत होते. त्यातून प्रतिदिवस 22 कोटी रुपये महसूल एसटी महमंडळाला मिळत होते. मात्र, कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय बंद असल्याने आणि प्रवासावर निर्बंध आल्याने दररोज 13 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

66 टक्‍क्‍यांनी प्रवासी घट -

देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यत मिनी लॉकडाऊन लागू केला आहे. त्यांच्या फटका तोट्यातील एसटी महमंडळाला बसला आहे. फेब्रुवारी महिन्यात एसटी बसेसमधून प्रति दिवस 33 लाख प्रवासी प्रवास करत होते. त्यातून 16 कोटी महसूल गोळा होत होता. मात्र, सध्या मिनी लॉकडाऊनमुळे 66 टक्के प्रवासी कमी झाले आहेत. सध्या दररोज 11 लाख प्रवासी एसटीमधून प्रवास करत असून त्यातून महमंडळाला 6 कोटी महसूल मिळत आहे.

नियमाचा फायदा नाही -

राज्य सरकारने कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिनी लॉकडाऊन लागू केला आहे. यामध्ये एसटीमधून प्रवास करणार्‍यांवर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. ज्यामध्ये एसटीमधून उभे राहून प्रवास करता येणार नाही. मात्र, या काळात एसटी रिकामी धावत असल्याने या नियमाचा काही फायदा झालेला नाही. राज्य शासनाने एसटी दररोज स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी एसटी महमंडळाला आदेश द्यावेत. जेणेकरून एसटी चालक-वाहकाबरोबरच प्रवाशांचे आरोग्य सुरक्षित राहील अशी प्रतिक्रिया एसटी चालकांनी नाव न छापण्याचा अटीवर दिली आहेत.

सत सॅनिटाईझ कराव्या लागत असल्याने निविदा आल्या काढण्यात -

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले की, एसटी बसेस नियमितपणे सॅनिटाईझ केल्या जात आहेत. मात्र, बसेस सतत सॅनिटाईझ कराव्या लागत असल्याने आम्ही आता या कामासाठी निविदा काढल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.