मुंबई - शासनाने शिक्षक आंतरजिल्हा बदलीचे ऑनलाइन धोरण (Teachers Online inter-district transfers) जाहीर केले आहे. या धोरणामध्ये 10 टक्के मनुष्यबळाची जाचक अट लावल्यामुळे कोकण विभागातील शिक्षक आंतरजिल्हा बदल्यापासून वंचित राहत आहेत. 10 टक्क्याची कोणतीही अट न लावता शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत सर्व जिल्ह्यांचा समावेश करावा या मागणीसाठी खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने (State Wide Teachers Protest) आंदोलनाचे पाऊल उचलले असून उद्या आझाद मैदानावर (Teachers protest at Azad Maidan in Mumbai) आंदोलन करण्यात येणार आहे.
आंतरजिल्हा बदल्यात सर्व जिल्ह्यांचा समावेश करा -
7 एप्रिल 2021 रोजी शासनाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यासाठी (Teachers Online inter-district transfers) नवीन बदली धोरण जाहीर केले आहे. या धोरणांमध्ये ज्या जिल्हा परिषदेत एकूण शिक्षक संख्येच्या 10 टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त असल्यास अशा जिल्ह्यातील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत सामाविष्ट केले जाणार नाही, अशा प्रकारची तरतूद केल्याने कोकण विभागात कार्यरत असलेल्या शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर व ठाणे या जिल्ह्यात असलेली रिक्त पदे शिक्षक भरतीमध्ये सामाविष्ट न केल्याने या ठिकाणी वारंवार दहा टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त राहतात. याचा फटका येथील कार्यरत शिक्षकांना बसत आहे. वास्तविक पाहता या विभागात 10 टक्केपेक्षा अधिक रिक्त पदे राहण्यास येथील कार्यरत शिक्षक जबाबदार नसतानादेखील यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 10 टक्क्याची जाचक अट शासनाने धोरणात समाविष्ट केल्यामुळे कोकण विभागातील सेवाजेष्ठ शिक्षकांपेक्षा इतर विभागातील सेवाकनिष्ठ शिक्षकांना स्वजिल्ह्यात आंतरजिल्हा बदल्या मिळत आहेत.
पहिल्याच दिवशी बेमुदत धरणे आंदोलन -
दहा टक्क्यांची कोणतीही जाचक अट न लावता शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत सर्व जिल्ह्यांचा समावेश करावा, नगर विकास विभागाच्या ऑफलाइन आंतरजिल्हा बदलीच्या शासन (Teachers protest at Azad Maidan in Mumbai) निर्णयाचा पुनर्विचार करून या शासन निर्णयातील शिक्षकांच्या बदल्याही ग्रामविकास विभागाच्या ऑनलाईन पोर्टल मधूनच कराव्यात, शिक्षक बदल्यांचे ऑनलाइन पोर्टल लवकरात लवकर सुरू करावे, बदलीचे पोर्टल सुरू करण्याअगोदर आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत जिल्हानिहाय व प्रवर्गनिहाय रिक्त पदे प्रसिद्ध करावेत, आंतरजिल्हा बदलीच्या अंतिम प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध कराव्यात या मागण्यासाठी खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेमुदत धरणे आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनास समस्याग्रस्त शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष गोविंद सोळंके पाटील यांनी केले आहे.
Azad Maidan Teachers Protest : बुधवारी राज्यभरातील शिक्षक विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात धडकणार !
राज्य सरकारने शिक्षक आंतरजिल्हा बदलीचे ऑनलाइन (Teachers Online inter-district transfers) धोरण जाहीर केले आहे. या धोरणामध्ये 10 टक्के मनुष्यबळाची अट लावल्यामुळे कोकण विभागातील शिक्षक आंतरजिल्हा बदल्यापासून वंचित राहत आहेत. 10 टक्क्याची कोणतीही अट न लावता शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत सर्व जिल्ह्यांचा समावेश करावा या मागणीसाठी उद्या मुंबईतील आझाद मैदानावर (Teachers protest at Azad Maidan in Mumbai) शिक्षक आंदोलन करणार आहेत.
मुंबई - शासनाने शिक्षक आंतरजिल्हा बदलीचे ऑनलाइन धोरण (Teachers Online inter-district transfers) जाहीर केले आहे. या धोरणामध्ये 10 टक्के मनुष्यबळाची जाचक अट लावल्यामुळे कोकण विभागातील शिक्षक आंतरजिल्हा बदल्यापासून वंचित राहत आहेत. 10 टक्क्याची कोणतीही अट न लावता शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत सर्व जिल्ह्यांचा समावेश करावा या मागणीसाठी खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने (State Wide Teachers Protest) आंदोलनाचे पाऊल उचलले असून उद्या आझाद मैदानावर (Teachers protest at Azad Maidan in Mumbai) आंदोलन करण्यात येणार आहे.
आंतरजिल्हा बदल्यात सर्व जिल्ह्यांचा समावेश करा -
7 एप्रिल 2021 रोजी शासनाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यासाठी (Teachers Online inter-district transfers) नवीन बदली धोरण जाहीर केले आहे. या धोरणांमध्ये ज्या जिल्हा परिषदेत एकूण शिक्षक संख्येच्या 10 टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त असल्यास अशा जिल्ह्यातील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत सामाविष्ट केले जाणार नाही, अशा प्रकारची तरतूद केल्याने कोकण विभागात कार्यरत असलेल्या शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर व ठाणे या जिल्ह्यात असलेली रिक्त पदे शिक्षक भरतीमध्ये सामाविष्ट न केल्याने या ठिकाणी वारंवार दहा टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त राहतात. याचा फटका येथील कार्यरत शिक्षकांना बसत आहे. वास्तविक पाहता या विभागात 10 टक्केपेक्षा अधिक रिक्त पदे राहण्यास येथील कार्यरत शिक्षक जबाबदार नसतानादेखील यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 10 टक्क्याची जाचक अट शासनाने धोरणात समाविष्ट केल्यामुळे कोकण विभागातील सेवाजेष्ठ शिक्षकांपेक्षा इतर विभागातील सेवाकनिष्ठ शिक्षकांना स्वजिल्ह्यात आंतरजिल्हा बदल्या मिळत आहेत.
पहिल्याच दिवशी बेमुदत धरणे आंदोलन -
दहा टक्क्यांची कोणतीही जाचक अट न लावता शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत सर्व जिल्ह्यांचा समावेश करावा, नगर विकास विभागाच्या ऑफलाइन आंतरजिल्हा बदलीच्या शासन (Teachers protest at Azad Maidan in Mumbai) निर्णयाचा पुनर्विचार करून या शासन निर्णयातील शिक्षकांच्या बदल्याही ग्रामविकास विभागाच्या ऑनलाईन पोर्टल मधूनच कराव्यात, शिक्षक बदल्यांचे ऑनलाइन पोर्टल लवकरात लवकर सुरू करावे, बदलीचे पोर्टल सुरू करण्याअगोदर आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत जिल्हानिहाय व प्रवर्गनिहाय रिक्त पदे प्रसिद्ध करावेत, आंतरजिल्हा बदलीच्या अंतिम प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध कराव्यात या मागण्यासाठी खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेमुदत धरणे आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनास समस्याग्रस्त शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष गोविंद सोळंके पाटील यांनी केले आहे.
TAGGED:
teachers agitation in mumbai