ETV Bharat / city

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना लाेकल प्रवासाची मुभा द्या; महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

नुकत्याच शिक्षकांसाठी झालेल्या लसीकरण माेहिमेत काही शिक्षकांनी पहिली लस घेतली. मात्र दुसरी लस राहिली आहे. या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना लाेकल प्रवासाची मुभा द्यावी, तसेच विद्यार्थ्यांनाही लाेकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.

लोकल
लोकल
author img

By

Published : Oct 1, 2021, 7:20 PM IST

मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या शाळा येत्या 4 ऑगस्टपासून सुरू हाेणार असल्याने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना लाेकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे केली आहे.

'विद्यार्थ्यांना लाेकल प्रवासाची मुभा द्या'

इयत्ता दहावी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा पालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे परिषदेने स्वागत केले आहे. पालिका क्षेत्रात कार्यरत असणारे 70 टक्के शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी हे मुंबईच्या बाहेरून वसई, विरार, कर्जत, कसारा, पनवेल, नवीमुंबई आदी भागातून येतात. त्यातील बहुतांशाचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. नुकत्याच शिक्षकांसाठी झालेल्या लसीकरण माेहिमेत काही शिक्षकांनी पहिली लस घेतली. मात्र दुसरी लस राहिली आहे. या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना लाेकल प्रवासाची मुभा द्यावी, तसेच विद्यार्थ्यांनाही लाेकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.

'आंदोलनाची वेळ येऊ नयेत'

गेल्या काही महिन्यांपूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम करण्यासाठी शिक्षकांना शाळांमध्ये बोलवण्यात आले होते. मात्र, शिक्षकांना लोकल प्रवासात मुभा दिली नव्हती. परिणामी अनेक शिक्षकांनी राज्य सरकारविरोधात मुंबई आणि उपनगरातील रेल्वे स्थानकांसमोर एक अनोखे आंदोलन केले होते. तशी वेळ यावेळेस येऊ नयेत, अशी अपेक्षा शिक्षकांनी केली आहे. सध्या मुंबईत काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी हे पालघर, वसई, विरार, अंबरनाथ, कल्याण, कर्जत, कसारा, नवी मुंबई आणि पनवेल अशा दूरच्या ठिकाणी राहतात. यामध्ये महिला शिक्षकांचे प्रमाण जास्त आहे. यामुळे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना लाेकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - नारायण राणेंना महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात का विलीन करावा लागला? राजकीय विश्लेषकांचं मत...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.