ETV Bharat / city

मागण्या पूर्ण करा, अन्यथा आत्मदहन; शिक्षकांचे शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या

author img

By

Published : Nov 3, 2021, 5:11 PM IST

शिक्षक कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक सचिन चव्हाण म्हणाले, की राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. पत्रव्यवहार, आंदोलन, उपोषण करत त्यांनी सरकार दरबारी गाऱ्हाणे घातले. आश्वासनाव्यतिरिक्त अद्याप काहीच मिळालेले नाही. सरकारने वाढीव पदांना मान्यता न दिल्यास आत्मदहन करू, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.

शिक्षकांचे आंदोलन
शिक्षकांचे आंदोलन

मुंबई - वर्षानुवर्षे अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात काम करणाऱ्या शिक्षकांच्या वाढीव पदांना मान्यता द्यावी, थकीत वेतन मिळावे, या मागणीसाठी राज्यभरातील शिक्षकांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर ठिय्या मांडला. मागण्या मान्य करा, अन्यथा आत्मदहन करु असा इशारा यावेळी देण्यात आला.

ऐन दिवाळीत घोषणाबाजी शिक्षकांनी शिक्षमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केल्याने मोठा गोंधळ उडाला. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केली. गेली दहा ते पंधरा वर्षापासून अनुदानित कनिष्ठ महाविदयालयातील शिक्षक विनावेतन काम करत आहेत. हे शिक्षण अनुदानित विषय शिकवत असून वाढीव पदांना मान्यता द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

हेही वाचा-100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख मुख्य लाभार्थी; ईडीच्या रिमांड नोटमध्ये उल्लेख

शिक्षक कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक सचिन चव्हाण म्हणाले, की राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. पत्रव्यवहार, आंदोलन, उपोषण करत त्यांनी सरकार दरबारी गाऱ्हाणे घातले. आश्वासनाव्यतिरिक्त अद्याप काहीच मिळालेले नाही. पुण्यातदेखील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करुन 2003-04 ते 2018-19 पर्यंत करिष्ठ महाविद्यालयातील वाढीव, प्रस्तावित पदांची संपूर्ण माहिती संचालक स्तरावरून मंत्रालयात पोहोचविली. आझाद मैदानात आंदोलन केले. आज आंदोलनाचा 69 वा दिवस आहे. सरकारने प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावावा, यासाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आज ठिय्या आंदोलन केल्याचे महाराष्ट्र राज्य अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पद शिक्षक कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा-तरुणाच्या आत्महत्येला मंत्री गडाख जबाबदार, त्यांनी राजीनामा द्यावा, भाजप प्रवक्त्याची मागणी

सरकारने वाढीव पदांना मान्यता न दिल्यास आत्मदहन करू, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे. दरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बंगल्यासमोर जोरदार घोषणाबाजी केल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मात्र, आंदोलनाला परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे काहीकाळ येथे मोठा गदारोळ झाला होता.

हेही वाचा-कुठला बॉम्ब फोडायचा हे फडणवीस यांनी स्वतःच ठरवावे - नीलम गोऱ्हे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.