ETV Bharat / city

सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी - sudhir mungantiwar news

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील गौरव प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी पुढे येत आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांमध्ये संबंधित विषयावरून खडाजंगी झाली.

sudhir mungantiwar news
सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
author img

By

Published : Feb 10, 2020, 9:44 PM IST

मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील गौरव प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी पुढे येत आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांमध्ये संबंधित विषयावरून खडाजंगी झाली. या खडाजंगीचे पडसाद बैठकीत उमटल्याने त्यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे नेते मुनगंटीवार यांनी माध्यमांसमोर येऊन खुलासा केला.

सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी

अर्थसंल्पीय अधिवेशनत 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अध‍िवेशनासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनात पार पडली. या बैठकीत सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसीच्या जनगणनेचा प्रस्ताव आणण्याची सूचना केली. तर लगेचच माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव दोन्ही सभागृहात आणून तो एकमुखाने मंजूर करण्याची मागणी लावून धरली.

यामुळे सुरुवातीलाच बैठकीत ओबीसी जनगनणना आणि सावरकर गौरव प्रस्तावामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद रंगला. या प्रस्तावावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विरोध दर्शवल्याने चांगलीच खडाजंगी झाली.

कामकाज सल्लागार समितीच्या या बैठकीनंतर मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांसमोर संबंधित प्रकरणावर खुलासा केला. त्यांनी या प्रस्तावाला विरोध केला असून भाजपवर टीका केली. तर मुनगंटीवार यांनी भाजपची बाजू स्पष्ट करताना सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव 26 फेब्रुवारीला विधानसभेत मांडण्याची मागणी केली आहे.

Intro:कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री-मुनगंटीवार यांच्यात खडाजंगी

विधानसभा अध्यक्षांच्या ओबीसी जनगणनेचा प्रस्ताव येताच भाजपाने आणला सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव

mh-mum-01-bac-mitting-vadettiwar-mungantiwar-byte-7201153

मुंबई, ता. १० :
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील गौरव प्रस्ताव आणून तो मंजूर करावा या मागणीवरून आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात खडाजंगी झाली. या खडाजंगीचे पडसाद या बैठकीत उमटल्याने त्यावर काँग्रेसचे नेते व विजय वडेट्टीवार आणि भाजपा नेते मुनगंटीवार यांनी माध्यमासमोर येऊन खुलासा केला.
अर्थसंल्पीय अधिवेशनत २४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अध‍िवेशनासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनात पार पडली, या बैठकीत सुरूवातीला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसीच्या जनगणनेचा प्रस्ताव आणण्याची सूचना केली तर लगेचच माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव दोन्ही सभागृहात आणून तो एकमुखाने मंजूर केला जावा, अशी मागणी लावून धरली. यामुळे बैठकीत सुरूवातीलाच ओबीसी जनगनणना आणि सावरकर यांच्या गौरव प्रस्तावावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद रंगला. सावरकर यांच्या गौरव प्रस्तावाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रस्तावावर आपला विरोध दर्शविल्याने मुख्यमंत्री आणि मुनगंटीवार यांच्यात जोरदार खंडाजंगी झाल्याचे समजते.
कामकाज सल्लागार समितीच्या या बैठकीनंतर मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी येऊन त्यावर खुलासा करत काँग्रेसची सावरकर यांच्या संदर्भात भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले. भाजपाचे मागील पाच वर्षांत राज्यात सरकार होते, त्यांना त्यावेळी सावरकर यांना भारतरत्न देण्याचा आणि गौरवाचा प्रस्ताव आणण्याचा विषय का सुचला नाही, पाच वर्षे हे काय झोपले होते काय, ही भाजपाची भूल होती काय, असा सवाल केला. केवळ त्यांना या विषयावर राजकारण करायचे असल्याचा आरोप केला. हातून सत्ता गेल्याने भाजपाकडे आता कोणतेही विषय उरलेले नाहीत, यामुळे ओबीसींच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी मुद्दामहून त्यावर राजकारण करण्यासाठी त्यांनी सावरकर यांच्यावरील गौरव प्रस्ताव देण्याची मागणी केली असल्याचाही आरोप वडेट्टीवार यांनी केला. यांना ओबीसींचा विरोध आहे. म्हणून त्यांनी हा विषय आणला आहे. मात्र सावरकर यांच्याविषयी काँग्रेसची भूमिका ही स्पष्ट आहे. त्यामुळे सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी आणि त्यांच्या गौरव प्रस्तावाला काँग्रेस कोणत्याही स्थितीत समर्थन देणार नसल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
तर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा व त्यांच्या गौरवाचा प्रस्ताव २६ फेब्रुवारी रोजी विधानसभेत आणला जावा अशी मागणी केली आहे. त्यावर आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतील हे पाहावे लागेल असे सांगितले. तर बैठकीत झालेल्या खडाजंगीवर त्यांनी कोणतेही भाष्य करण्यास टाळले. तर आम्ही हे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ दिवस चालावे अशी मागणी केली आहे. ती मागणी मान्य होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. Body:विधानसभा अध्यक्षांच्या ओबीसी जनगणनेचा प्रस्ताव येताच भाजपाने आणला सावरकरांच्या गौरवाचा प्रस्तावConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.