ETV Bharat / city

मुंबईसह ठाणे - कळवा भागातील वीज पुरवठा अचानक खंडीत, रेल्वे वाहतुकीवर परिणाम - Mumbai area power outage

मुलुंड-ट्रॉम्बे वीज वाहिनीतील तांत्रिक बिघाडामुळे सकाळी मुंबईसह ठाणे - कळवा भागातील वीज पुरवठा अचानक खंडीत झाला. मुंबईकरांची यामुळे मोठी गैरसोय झाली. तर लोकल वाहतुकीवरही परिणाम झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक काही काळासाठी कोलमडून पडले. महावितरण, बेस्ट, आदानी आदी वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी तात्काळ दुरुस्ती काम हाती घेतले.

electricity
विद्युत
author img

By

Published : Feb 27, 2022, 3:56 PM IST

मुंबई - मुलुंड-ट्रॉम्बे वीज वाहिनीतील तांत्रिक बिघाडामुळे सकाळी मुंबईसह ठाणे - कळवा भागातील वीज पुरवठा अचानक खंडीत झाला. मुंबईकरांची यामुळे मोठी गैरसोय झाली. तर लोकल वाहतुकीवरही परिणाम झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक काही काळासाठी कोलमडून पडले. महावितरण, बेस्ट, आदानी आदी वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी तात्काळ दुरुस्ती काम हाती घेतले. मात्र, काही भागात तासाभरात वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याची माहिती वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून देण्यात आली.

हेही वाचा - Sanjay Raut on raids : केंद्रिय एजन्सींना केवळ महाराष्ट्रातच काम आहे - संजय राऊत

मुलुंड - ट्रॉम्बे येथील वीज पुरवठा करणाऱ्या केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. परिणामी वीजपुरवठा खंडित झाला. सीएसएमटी, भुलेश्वर, ताडदेव, परळ, सायन, वडाळा, अंटोप हिल, माहिम, दादर, लालबाग, मस्जिद, वरळी, काळबादेवी या दक्षिण विभागासह पूर्व - पश्चिम उपनगर, ठाणे आणि कळवा भागातील बत्ती गुल झाली होती. सकाळच्या सुमारास अचानक वीज गायब झाल्याने मुंबईकरांची मोठी गैरसोय झाली.

दक्षिण मुंबईत बहुतांशी महत्वाची कार्यालये आहेत. मात्र, रविवार असल्याने कार्यालये बंद होती. त्यामुळे, फारसा परिणाम येथे जाणवला नाही. रविवारचा मेगाब्लॉक त्यात वीज गायब झाल्याने लोकल सेवा कोलमडली. सकाळी ९.४० वाजल्यापासून अंधेरी ते चर्चगेट व मध्य रेल्वेवरील वाहतुकीवर परिणाम झाला. वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र, या कालावधीत कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांची धावपळ उडाली. अनेक वसाहतींमध्येही वीज नसल्याने अनेकांची गैरसोय झाली. मुलुंड-ट्रॉम्बेमधील ट्रान्समिशन लाईन ट्रिप झाल्यामुळे मुंबईतील बहुतांश भागांतील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला, अशी माहिती बेस्टच्या बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन विभागातून देण्यात आली.

हेही वाचा - VIDEO : नवाब मलिकांना अटक; केंद्र सरकारविरोधात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.