ETV Bharat / city

'तुम्ही अमरावतीहून नागपूरला कसे जाता, ते पाहूनच घेऊ', मंत्री उदय सामंतांना फोनवरून धमकी - minister uday samant latest news

धमकीचा फोन कोठून आलाय, हे तपासून पाहिले असता स्थानिक विद्यार्थी संघटनेच्या एका प्रतिनिधीने हा फोन केला असल्याचे सांगण्यात येते. राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात विविध विद्यापीठांकडेमध्ये तयारी सुरू आहे. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षासोबतच इतर काही पर्याय देण्यात आले असून त्या पर्यायांची माहिती घेण्यासाठी सामंत राज्यभरातील विद्यापीठांचा दौरा करत आहेत. राज्यातील या परीक्षा सुरळीत पार पाडल्या जाव्यात, विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत म्हणून सामंत हे स्वतः विद्यापीठांमध्ये जाऊन माहिती घेत आहेत.

student give threatens to minister uday samant over phone at amravati
मंत्री उदय सामंतांना फोनवरून धमकी, विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडे संशयाची सुई
author img

By

Published : Sep 15, 2020, 5:46 PM IST

Updated : Sep 15, 2020, 6:46 PM IST

मुंबई - राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचे फोन येण्याचे प्रकरण ताजे असतानाच आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना एका विद्यार्थी संघटनेने दूरध्वनीवरून धमकीचा फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे इतर विद्यार्थी संघटनांमध्ये तीव्र पडसाद उमटले असून सामंत यांना केलेल्या धमकीच्या फोनबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि त्यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी उदय सामंत हे राज्यभरातील विविध विद्यापीठांचा दौरा करत असून त्याच पार्श्वभूमीवर आज ते अमरावती येथे होते. याठिकाणी त्यांच्याविरोधात एका विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधीनी गोंधळ घालून निदर्शने करण्याची तयारी केली होती. ही माहिती पोलीस यंत्रणेने त्यांना दिल्याने सामंत यांनी या विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत भेटण्याची वेळ नाकारली होती. यामुळे या संघटनेच्या एका प्रतिनिधीकडून 'तुम्ही अमरावतीहून नागपूरला कसे जातात पाहूनच घेऊ,' अशा पद्धतीची धमकी फोनवरून त्यांच्या पीएला दिली आहे.

यासंदर्भात धमकीचा फोन कोठून आलाय, हे तपासून पाहिले असता स्थानिक विद्यार्थी संघटनेच्या एका प्रतिनिधीने हा फोन केला असल्याचे सांगण्यात येते.
राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात विविध विद्यापीठांकडेमध्ये तयारी सुरू आहे. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षांसोबतच इतर काही पर्याय देण्यात आले असून त्या पर्यायांची माहिती घेण्यासाठी सामंत राज्यभरातील विद्यापीठांचा दौरा करत आहेत. राज्यातील या परीक्षा सुरळीत पार पाडल्या जाव्यात, विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, म्हणून सामंत हे स्वतः विद्यापीठांमध्ये जाऊन माहिती घेत आहेत. अशा स्थितीमध्ये आज त्यांना आलेल्या धमकीमुळे इतर विद्यार्थी संघटनांमध्ये तीव्र पडसाद उमटले असून सामंत यांना केलेल्या धमकीच्या फोनचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. अशा प्रकारची धमकी देणाऱ्या संघटनाच्या प्रतिनिधींवर आणि संघटनेवर ही तात्काळ कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

धमक्यांना घाबरणार नाही - उदय सामंत

आज अमरावतीला असताना मला नागपूरला परत जाऊ दिले जाणार नाही, असा धमकी वजा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मला दिला आहे. मात्र, धमक्यांना घाबरणार नाही. पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील. खरं तर, विद्यार्थी संघटनांनी राजकारण करण्याऐवजी विद्यार्थीहिताला प्राधान्य द्यावे, असे उदय सामंत म्हणाले. यावेळी अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि माजी आमदार प्रा.विरेंद्र जगताप उपस्थित होते.

Last Updated : Sep 15, 2020, 6:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.