मुंबई - मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या 'लोकल'मधून दररोज सुमारे 80 लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. यादरम्यान, अनेकवेळा प्रवाशांचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप वगैरे मौल्यवान वस्तू चोरीला जातात अथवा गहाळ होतात. अशा गहाळ वा चोरी झालेल्या वस्तूंना शोधून लोहमार्ग पोलीस त्या परत करत असते.
काल झालेल्या धनत्रयोदशीचे औचित्य साधून, लोहमार्ग पोलिसांनी मोठ्या प्रमाणात किमती मुद्देमाल, सोन्याचे दागीने, रोख रक्कम असा ऐवज फिर्यादींना परत केला.
घाटकोपरच्या रेल्वे पोलीस मुख्यालय येथे लोहमार्ग पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांच्या हस्ते प्रवाशी फिर्यादींचा मुद्देमाल सर्व प्रकारची कागदपत्रे पडताळून परत करण्यात आला. लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या 500 किमी हद्दीत असलेल्या 17 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 81 लाख 60 हजार रुपयांचा हा मुद्देमाल होता. यावेळी उपस्थित सर्व फिर्यादींनी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.
हेही वाचा : शेअर बाजार निर्देशांक ३७.६७ अंशाने वधारून बंद; 'या' कंपन्यांचे वधारले शेअर