ETV Bharat / city

ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारचा लढा सुरूच राहील -छगन भुजबळ - OBC reservation

महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम करण्‍याच्‍या सूचना निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण मिळेल का? दरम्यान, ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारचा लढा हा शेवटपर्यंत सुरूच राहील असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षण घालवणे हा विरोधकांचा आरोप निरर्थक असल्याचही छगन भुजबळ म्हणाले आहेत. मुंबईत आज बुधवार (दि. 25 मे)रोजी जितेंद्र आव्हाड यांच्या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

छगन भुजबळ
छगन भुजबळ
author img

By

Published : May 25, 2022, 10:25 AM IST

मुंबई - चौदा महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम करण्‍याच्‍या सूचना निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण मिळेल का? दरम्यान, ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारचा लढा हा शेवटपर्यंत सुरूच राहील असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षण घालवणे हा विरोधकांचा आरोप निरर्थक असल्याचही छगन भुजबळ म्हणाले आहेत. मुंबईत आज बुधवार (दि. 25 मे)रोजी जितेंद्र आव्हाड यांच्या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

समितीला सुचना न देता विरोधक केवळ बाहेर बोलतात - ओबीसी आरक्षणासाठी कोणाच्याही सूचना असल्यास त्यांनी त्या बांठीया समितीला द्याव्यात असं आव्हान समितीकडून करण्यात आले आहे. मात्र, विरोधक कोणत्याही सूचना बांठीया समितीला देत नाहीत. केवळ प्रसारमाध्यमांसमोर आरोप करतात असा टोला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी विरोधकांना लावला आहे. तात्कालीन देवेंद्र फडवणीस सरकार असताना त्यांनी ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डेटा का गोळा केला नाही.

ओबीसी आरक्षण आकारण्यात आलं होत - गेली दोन वर्ष कोरोना चा प्रादुर्भाव असल्यामुळे इम्पेरिकल डेटा गोळा करता आला नव्हता. एवढंच काय तर केंद्र सरकारने देखील जनगणना केली नाही. मात्र यावर विरोधक काहीही न बोलता केवळ इम्पेरिकल डेटा गोळा केला नाही असा आरोप राज्य सरकारवर करत आहेत असे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी यावेळी दिले. तसेच ज्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारच्या ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालय नाकारलं त्याचप्रमाणे मध्य प्रदेश सरकारचा देखील ओबीसी आरक्षण आकारण्यात आलं होत. मात्र, मध्य प्रदेश सरकारचे ओबीसी आरक्षण नाकारल्या नंतर लगेच त्या साठी केंद्र सरकार कडून सॉलिटेअर रिजनल बाजू मांडण्यात उभे राहिले. मात्र महाराष्ट्राच्या बाजूने केंद्र सरकारने आपली बाजू मांडली नाही अशी खंतही छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीचा ओबीसी मेळावा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उद्या ओबीसी मेळावा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ओबीसी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. या मिळालं बाबतच्या आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, मंत्री जितेंद्र आव्हाड, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक जितेंद्र आव्हाड यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली.

हेही वाचा - Hardik Patel : हार्दिक पटेल 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता.. लवकरच मोदी-शहा यांची घेणार भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.