ETV Bharat / city

पावसाळ्यापूर्वी राज्य शासन अॅक्शन मोडवर; 'कार्यालयात बसू नका, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करा' - State government on action mode before monsoon

पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी राज्य सरकार अॅक्शनमोड आले आहे. नालेसफाई, पूरजन्य स्थिती, रस्त्यांवरील खड्डे, होर्डिंगची तपासणी, साथीचे आजार रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करा. तसेच मान्सून पूर्व कामांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन आढावा घ्या. केवळ कार्यालयात बसून राहू नका, अशा शब्दांत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त, नगर पालिका, नगर पंचायतींच्या प्रशासनाला चांगलेच खडसावले.

eknath shinde
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Jun 3, 2022, 9:40 PM IST

मुंबई - पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी राज्य सरकार अॅक्शनमोड आले आहे. नालेसफाई, पूरजन्य स्थिती, रस्त्यांवरील खड्डे, होर्डिंगची तपासणी, साथीचे आजार रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करा. तसेच मान्सून पूर्व कामांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन आढावा घ्या. केवळ कार्यालयात बसून राहू नका, अशा शब्दांत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त, नगर पालिका, नगर पंचायतींच्या प्रशासनाला चांगलेच खडसावले. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी शासकीय यंत्रणांनी नियंत्रण कक्ष, आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. लोकसहभाग वाढवा. आपत्कालीन स्थितीत तोंड आवश्यक साधन सामुग्री, उपकरणांची खरेदी करा, अशा सूचना मंत्री शिंदे यांनी दिल्या.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका- नगरपंचायतींनी केलेल्या तयारीचा आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीस नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपरिषद मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेऊन निर्देश दिले आहेत. शहरांमधील नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन दलाची सज्जता, धोकादायक इमारती, वृक्षछाटणी आदी विषयांवर महानगरपालिका, नगरपालिकांनी तातडीने कार्यवाही करावी, त्यासाठी विविध विभागांशी समन्वय राखण्याच्या सूचना नगरविकास मंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.

नालेसफाईवर विशेष लक्ष द्या - शहरांमधील नाल्यांची १०० टक्के सफाई होईल, याकडे विशेष लक्ष द्या. नालेसफाई झालेल्या भागातील गाळ, कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना नगर विकास मंत्र्यांनी यावेळी दिल्या. शहरातील पाणी साचणारी ठिकाणे शोधून आवश्यक त्या उपाययोजना करा. रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यापूर्वी तात्काळ भरा, असे निर्देश मंत्री शिंदे यांनी दिले. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी पूर्वतयारी करुन ठेवा. तसेच शहरातील मोठे होर्डिंग्ज पडून दुर्घटना घडणार नाहीत, यासाठी होर्डिंग्जची तपासणी करण्याच्या सूचनाही नगरविकासमंत्री शिंदे यांनी दिल्या.

नियंत्रण कक्ष सज्ज ठेवा - पावसाळ्याच्या काळात संकटसमयी शहरांमधील रहिवाशांना तात्काळ मदत पोहोचावी यासाठी सर्व महानगरपालिका, नगरपालिकांनी आपले नियंत्रण कक्ष सज्ज ठेवावेत. जनतेला माहिती देण्यासाठी अलर्ट प्रणाली कार्यन्वित ठेवण्याबरोबरच नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जनतेपर्यंत प्रसारमाध्यमांद्वारे पोहोचवा, अशा सूचनाही नगर विकास मंत्र्यांनी दिल्या. तसेच नियंत्रण कक्षाची सज्जता तपासण्यासाठी मॉकड्रील घ्या. तपासणीसाठी कार्यालयात न बसता नियंत्रण कक्षाला आयुक्तांनी अचानक भेटी देऊन पाहणी करा, असे आदेशही मंत्री शिंदे यांनी दिले.

साथीचे आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना करा - साथीचे आजार उद्भवणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, त्याशिवाय औषधांचा पुरेसा साठा करण्यासह आपत्कालिन स्थितीमध्ये रुग्णालय, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाला सज्ज करुन ठेवण्याचे निर्देशही यावेळी नगरविकासमंत्र्यांनी दिले.

जलसंपदा विभागाने सतर्क रहावे - पावसाळ्यात धरणांचे दरवाजे उघडताना खालच्या गावांची स्थिती पाहून संबंधितांशी संपर्क-समन्वय करुनच निर्णय घ्यावा. दरवाजे उघडल्यानंतर खालच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतानाच जलसंपदा विभागाच्या सर्व अभियंत्यांनी या काळात अधिक सतर्क राहावे. नदीकाठच्या गावांशी संपर्क तुटल्यास त्या गावांमधील रहिवाशांना अन्नधान्य, औषधे पुरविण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे. धबधब्यासारख्या पर्यटन प्रवेश बंदीच्या ठिकाणावर लक्ष ठेवून कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी सतर्क राहावे. भूस्खलन किंवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी अधिक दक्षता घेऊन अग्निशमन दलाला सज्ज राहण्याच्या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

स्थानिकांच्या सहभागासाठी 'ठाणे पॅटर्न' राबवा - पावसाळ्याच्या काळात आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास ठाण्याच्या धर्तीवर स्थानिक व्यवस्थापन समितीमध्ये स्थानिकांचा सहभाग घेण्यात यावा, त्याचा निश्चितच मदतकार्यात फायदा होईल. मुंबई महानगर पालिकेने एमएमआरडीए, एमएसआरडीसी, जिल्हा प्रशासन, रेल्वे आदी सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवा, अशा सूचना मंत्री शिंदे यांनी दिल्या. तसेच महानगर पालिकेने नोडल अधिकारी नियुक्त करावेत. तर मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व यंत्रणांनी पावसाळ्याच्या काळात सतर्क राहावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.