ETV Bharat / city

महाडमध्ये एसडीआरएफचा बेस कॅम्प उभारण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक - मंत्री आदिती तटकरे

महाडमध्ये एसडीआरएफचा बेस कॅम्प उभारण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

Aditi Tatkare
मंत्री आदिती तटकरे
author img

By

Published : Jul 29, 2021, 5:58 AM IST

मुंबई - कोकणात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाडमध्ये एसडीआरएफचा बेस कॅम्प उभारण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच तळीये गावाचे ६ महिन्यात पुनर्वसन करणार असल्याचे त्या म्हणाल्या. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या.

  • तळीये गावाचे ६ महिन्यात पुनर्वसन -

जिथे आता गाव होते, त्याच्या जवळच पुनर्वसन केले जावे अशी, दुर्घटनाग्रस्त तळीये गावातील लोकांची मागणी आहे. ही बाब विचारात घेत, पुनर्वसन या विषयावर ग्रामस्थांबरोबर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, अशा तटकरे म्हणाल्या. दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी स्थानिकांना आश्वासित करताना त्यांच्या इच्छेनुसारच त्यांच्या पूनर्वसनाबाबत योग्य तो निर्णय घेऊ. तळीये गावातील लोकांचे पुनर्वसन त्यांनी सांगितलेल्या जागी 6 महिन्यात केले जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

  • एनडीआरएफ कॅम्प -

कोकण भागात आपत्कालीन परिस्थिती उद्धवल्यास तत्काळ मदतीसाठी एनडीआरएफचा कॅम्प असावा. केंद्राकडे एनडीआरएफचा बेस कॅम्प उभारण्याची तशी मागणी केली आहे. मात्र केंद्राच्या निर्णयात अडथळे येत असतील तर राज्य सरकार एसडीआरएफचा कॅम्प उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.